अभिनेता आणि राजकीय नेता कमल हासन (Kamal Haasan) यांच्या मक्कल निधी मय्यम पक्षाने (Makkal Needhi Maiam Party) तामिळनाडू विधानसभा निवडणूक 2021 मध्ये निराशाजनक कामगिरी केली. या कामगिरीनंतर पक्षाला गळती लागली आहे. निवडणुकीतल अल्पशा यशानंतर कमल हसन यांच्या एमएनएम (MNM) पक्षाने आणखी एक तगडा नेता गमावला आहे. पक्षाचे महासचिव सीएक कुमारवाले (CK Kumaravel) यांनी पक्ष सोडला आहे. दुसऱ्या बाजूला कमल हसन यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, नायकांची पूजा नाही (No Hero Worship), अशी प्रतिक्रिया कुमारवाले यांनी पक्ष सोडताना दिली आहे.
विधानसभा निवडणुकीचे निकाल 2 मे या दिवशी लागले. या निकालानुसार तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत कमल हासन यांच्या मक्कल निधी मय्यम पक्षाला प्रभावी कामगिरी करता आली नाही. स्वत: कमल हासन यांचा या निवडणुकीत पराभव झालाच. परंतू, 234 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत हासन यांच्या पक्षाला केवळ एक जागा मिळाली. (हेही वाचा, Tamil Nadu Assembly Elections 2021: अभिनेता Kamal Haasan कोयंबटूर मतदारसंघातून लढणार तामिळनाडू विधानसभा निवडणूक)
कमल हासन यांच्या पक्षाला अवघे तीन वर्षेच झाली आहेत. अशात विधानसभा निवडणुकीत या पक्षासमोर अस्तित्वाचे संकट निर्माण झाले आहे. सीके कुमरवले हे त्या सहा नेत्यांपैकी होते. ज्यांनी एमएनएम पक्षाच्या निवडणुकीतील पराभवानंतर पदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा देत त्यांनी पक्षाच्या रणनिती समितीवर योग्य मार्गदर्शन न केल्याचा ठपका ठेवला होता.
सीके कुमारवाले यांनी पक्ष सोडताना प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, नायकाची पूजा नाही 'No hero worship'. आम्ही इतिहास घडवणार होतो. परंतू आता आम्ही इतिहास वाचत आहोत. मला धर्मनिरपेक्ष लोकशाहीचे राजकारण करायचे आहे, असेही कुमारवाले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पक्षाचे सरचिटणीस एम मुरुगानंदम यांनीही एमएनएमची साथ नुकतीच सोडली. पक्ष सोडताना त्यांनी कमल हासन यांच्या नेतृत्वावर टीका करत पक्षात प्रामाणिकपणाचा अभाव असल्याचे म्हटले. दरम्यान, पर्यावरणवादी कार्यकर्त्या असलेल्या पद्मा प्रिया यांनीही व्यक्तीगत कारण देत पक्षाचा नुकताच त्याग केला.