भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ पुन्हा वाढवण्यात आला आहे. आता ते जून 2024 पर्यंत पक्षाच्या अध्यक्षपदी राहतील. भाजपच्या अधिवेशनात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून आता 2024 ची लोकसभा निवडणूक जिंकण्याची जबाबदारी नड्डा यांच्या खांद्यावर असणार आहे. गेल्या वर्षीही पक्षाने त्यांच्या अध्यक्षपदावर विश्वास व्यक्त केला होता, आता पुन्हा एकदा त्यांना संधी देण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमधून जो विजय मिळवला त्याचे श्रेय जेपी नड्डा यांना देण्यात येते. ( PM Narendra Modi: राष्ट्रीय धोरणासाठी आमचे काम, केवळ सत्तेसाठी आम्ही तिसरी टर्म मागतन नाही- पंतप्रधान मोदी)
आगामी लोकसभा निवडणूकीत देखील 400 जागांचा टप्पा ओलांडण्याची तयारीही जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली एनडीएकडून केली जात आहे. गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अधिवेशनाला संबोधित केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला, पुढील रणनीतीवर सविस्तर चर्चा केली आणि तिसऱ्या टर्मबाबत विश्वास व्यक्त केला.
यावेळी गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्ष हे देशातील लोकशाही संपवत आहेत. त्यांनी देशातील लोकशाहील भ्रष्टाचार, परिवारवाद आणि जातीवादाचे रंग दिले आहेत. परिवारवादी पक्ष या माध्यमातून अशी लोकशाही व्यवस्था उभी करत आहेत ज्यामधून जनमत कधीच स्वतंत्रपणे वर येऊ नये. पंतप्रधान मोदीनी दहा वर्षात भ्रष्टाचार, परिवारवाद, तुष्टिकरण आणि जातीवाद संपवून विकास केला आहे.