दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराचा दाखला देत त्यांनी राष्ट्रनिर्मितीसाठी पुढचे 100 दिवस नवीन उर्जा, नवा उत्साह, नवा आत्मविश्वास आणि नव्या उमेदीनं काम करण्याचं आवाहन केलं. 10 वर्षांचा सदोष कार्यकाळ आणि 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढणं सामान्य गोष्ट नव्हती. देश भ्रष्टाचार आणि दहशतवादापासून मुक्त झाला असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. (हेही वाचा - Lok Sabha Elections: लोकसभा निवडणूक 2024 कधी होणार? मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले 'हे' मोठे अपडेट)
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या कारभारावरही जोरदार टिका केली आहे. माझ्या दुसऱ्या कार्यकाळात एका जुन्या विरोधी नेत्याने तुम्ही आता विश्रांती घ्या, असे सांगितले होते. मी म्हणालो की आम्ही राजकारणासाठी नाही तर राष्ट्रीय धोरणासाठी काम करतो. आम्ही शिवाजी महाराजांच्या मार्गावर चालतो. सत्ता उपभोगण्यासाठी मी तिसरी टर्म मागत नसून राष्ट्रासाठी सत्तेत यायचे असल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले.
एनडीएला 400 चा टप्पा पार करण्यासाठी भाजपला 370 चा टप्पा पार करावा लागेल. आम्ही छत्रपती शिवरायांना मानणारे लोक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा ते म्हणाले नव्हते की, सत्ता मिळाली तर उपभोग घेऊया. त्याने आपले ध्येय चालू ठेवले. मी माझ्या स्वतःच्या आनंदासाठी आणि गौरवासाठी जगणारी व्यक्ती नाही. मी भाजप सरकारची तिसरी टर्म सत्ता उपभोगण्यासाठी मागत नाही. मी देशासाठी संकल्प घेऊन बाहेर पडलेली व्यक्ती आहे.