JNU Violence: जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोष हिने हिंसाचारापूर्वी 3 तास दिल्ली पोलिसांना माहिती देत मागितली होती मदत; रिपोर्ट
JNUSU chief Aishe Ghosh | (Photo Credits: ANI)

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये रविवार 5 जानेवारीचया रात्री हिंसाचार भडकला आणि रातोरात त्याचे पडसाद देशभरात पसरले. या प्रकरणी जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोष (Aishe Ghosh) सह 19 अन्य लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मात्र इंडिया टुडेच्या दाव्यानुसार जेएनयूमध्ये हिंसाचार भडकण्यापूर्वी आईशी घोष या विद्यार्थीनीने वसंत कुंज पोलिस अधिकारी संजीव मंडल आणि स्पेशल सीपी आनंद मोहन यांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून काही लोकं शस्त्र घेऊन आले असल्याची माहिती कळवली होती.

इंडिया टुडेच्या व्हॉट्सअ‍ॅप स्क्रिनशॉर्टनुसार आईशीने दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी माहिती कळवून मदत मागितली होती. मात्र तरी देखील रविवारी रात्री हिंसा भडकली. यामध्ये काही बुरखाधारींनी शिक्षक, विद्यार्थ्यांवर हल्ला केला. तसेच युनिव्हर्सिटीच्या परिसरात तोडफोड केली. हिंसाचारात जखमी आईशीने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यावेळेस तिला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचं तिने म्हटलं आहे. या हिंसाचारामध्ये 35 विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले. त्यानंतर दिल्ली पोलिस जेएनयूमध्ये पोहचले.

इथे पहा ट्वीट

जेएनयू मधील हिंसाचारानंतर राजकीय मंडळी, बॉलिवूड कलाकार यांच्या समवेत सामान्यांनीदेखील निषेध व्यक्त केला आहे. सध्या या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू असून सीसीटीव्ही फूटेज, व्हिडिओ अअणि सोशल मीडियामधील पोस्टच्या माध्यमातून संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे.