Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

झारखंडच्या (Jharkhand) खूंटीचे पत्रकार अनिल मिश्रा यांचा धाकटा मुलगा संकेत कुमार मिश्रा याच्या हत्येचा छडा पोलिसांनी लावला आहे. 30 तासांच्या आत पोलिसांनी हत्येतील आरोपी असलेल्या दोघांना ताब्यात घेतले असून, हत्येप्रकरणी वापरले गेलेले शस्त्र, मोबाईल व मोटरसायकल ताब्यात घेतली आहे. ही माहिती देताना खुंटीचे पोलिस अधीक्षक आशुतोष शेखर म्हणाले की, संकेतची हत्या त्याच्या सख्या चुलतीने घरचा नोकर बिरसा मुंडा याच्या मदतीने केली. संकेतचा मृतदेह सापडल्यानंतर दोघेही फरार होते. छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यातील कुनकुरी येथून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी खुनाची कबुली देत ​​सर्व गोष्टी सांगितल्या.

मृत संकेतच्या काकीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 2018 मध्ये तिने नोकर बिरसा मुंडा याच्याशी सोनमेर मंदिरात विवाह केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, दोड़ी जंगलात पोलिसांना अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. पत्रकार अनिल मिश्रा यांचा धाकटा मुलगा संकेत कुमार अशी मृतदेहाची ओळख पटवली गेली. घटनेनंतर पोलिस अधीक्षकांनी उपविभागीय पोलिस अधिकारी ओम प्रकाश तिवारी यांच्या नेतृत्वात आठ सदस्यांची एसआयटी स्थापन केली. त्यानंतर तपास आणि चौकशीमधून गठित पथकाने मृताचे आणि त्याच्या चुलतीचे व तसेच चुलती आणि घरातील नोकर बिरसा मुंडाचे अनैतिक संबंध असल्याची बाब उघडकीस आणली. (हेही वाचा: मुंबई: चेंबूर येथे 27 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; 7 जणांना अटक)

या प्रकारामुळे संकेत आणि नोकरामध्ये बरेच मतभेद होते. दरम्यान, संकेतने त्याच्या चुलतीकडे काही पैसे मागितले होते. चुलतीने पैसे देणे आणि पिकनिकच्या देण्याच्या बहाण्याने त्याला प्रेमघाघ येथे बोलावले. तिथे संकेत आणि काकू यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. त्यानंतर नोकर बिरसा देखील तिथे पोहोचला व त्यानंतर संकेत व त्याच्यातही भांडण झाले. या भांडणामध्ये बिरसाने धारदार शस्त्राने संकेतवर हल्ला केला आणि त्याची हत्या केली. यावेळी नोकर बिरसाने मृतदेहाची ओळख लपवण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.