झारखंड: 3 वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार करून छाटलं मुंडकं, अनुष्का शर्मा ने ट्विट करून व्यक्त केला संताप
Image For Representation (Photo Credits: File Image)

देशभरात वारंवार समोर येणाऱ्या बलात्काराच्या घटना खरोखरच माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत. झारखंड (Jharkhand) मधील जमशेदपूर (Jamshedpur)  मध्ये देखील काही दिवसांपूर्वी अशीच एक लज्जास्पद घटना घडली. रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर आपल्या आईच्या शेजारी झोपलेल्या एका तीन वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून काही नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हा अत्याचार सहन न झाल्याने साहजिकच ही मुलगी जेव्हा रडू लागली तेव्हा या निर्दयी बलात्काऱ्यांनी क्रूरपणे तिचा शिरच्छेद केला. या प्रकरणी देशभरातून संताप व्यक्त केला जात असताना, आता अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma)  हिने सुद्धा एका ट्विटच्या माध्यमातून आपला राग मांडला आहे. अनुष्काने आपल्या ट्विट मध्ये ही घटना अत्यंत लाजीरवाणी असल्याचे म्हणत आरोपीना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

अनुष्का शर्मा ट्विट

प्राप्त माहितीनुसार, हा प्रकार 25 जुलैला घडला ज्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच 30जुलैला पोलिसांना या चिमुकलीचा शीर नसलेला मृतदेह हाती लागला. स्टेशन वरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 5 दिवसांनंतर पोलिसांना आरोपींपर्यंत पोहचता आले.यानंतर आरोपी रिंकू साहू आणि कैलाश कुमार या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही अल्पवयीन चिमुकली पश्चिम बंगालच्या झालदा जिल्ह्यातील रहिवासी असून मुख्य आरोपी रिंकूनं टाटानगर रेल्वे स्टेशनवरून अपहरण केलं होतं. ही घटना उघडकीस आली असली तरी अद्याप पोलिसांना मृत बालिकेचं कापलेलं शीर सापडलेलं नाही.धक्कादायक! दीड वर्षाच्या भाचीवर मामाने केला बलात्कार; चिमुरडीला झुडूपात फेकून देऊन झाला पसार

दरम्यान, पोलिसांच्या चौकशी दरम्यान आरोपींनी आपला गुन्हा मान्य केला आहे. चिमुकलीवर बलात्कार केल्यानंतर तिची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह झाडीत फेकला होता अशी कबुली दिली आहे. तपासानुसार मुख्य आरोपी रिंकू साहू याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हेगारी रेकॉर्ड्स असल्याचे दिसून झाले आहे.