केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी देणार्या गुंड जयेश पुजारीची (Jayaesh Pujari) आज कोर्ट परिसरात नागरिकांनी धुलाई केली आहे. बेळगाव मध्ये कोर्टात आज जयेशला आणल्यानंतर त्याने सातत्याने 'पाकिस्तान झिंदाबाद' च्या घोषणा दिल्या. यानंतर संतप्त जमावाने त्याची तेथेच धुलाई केली. दरम्यान जयेश वर आयपीएस अधिकाऱ्याला धमकी दिल्याचेही आरोप आहेत. तो या प्रकरणी सध्या अटकेत आहे.
जयेश पुजारी सध्या हिंडलगा जेलमध्ये आहे. त्याला आज बेळगाव कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याने आपण पोलिसांसमोर वारंवार आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करत असता ते ऐकून घेत नसल्याचा आरोप करत 'पाकिस्तान जिंदाबाद' च्या घोषणा दिल्या. जयेशच्या घोषणांनी नागरिकही संतापले आणि त्यांनी त्याला मारहाण सुरू केली. दरम्यान पोलिसांनी त्याला तेथून बाहेर काढले पण यामुळे काही काळ कोर्ट परिसरामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होती.. (हेही वाचा, Nitin Gadkari Threat Call Case: नितीन गडकरी धमकी प्रकरणात मंगळुरु येथून एक तरुणी पोलिसांच्या ताब्यात ).
Criminal #JayeshPoojari from #Puttur, #Magaluru thrashed in court hall at #Belagavi, #Karnataka for Pro Pakistan slogans.
Jayesh Pujari was arrested for allegedly making threatening phone calls made to Union minister #NitinGadkari last year. pic.twitter.com/kQWFj0RqSw
— Hate Detector 🔍 (@HateDetectors) June 12, 2024
काही दिवसांपूर्वीच तुरुंगात असताना जयेशने लोखंडी तार गिळण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर जयेश पुजारीला देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. तपासणीमध्ये त्याच्या पोटात वायरीचे तुकडे आढळून आले आहेत मात्र तो ठीक आहे.
बेळगावी तुरुंगात असताना, पुजारीने बेंगळुरू दहशतवादी हल्ल्याचा दोषी अफसर पाशा याच्याशी संगनमत करून या वर्षी जानेवारीमध्ये गडकरींच्या कार्यालयात धमकीचे फोन केले होते.