Japanese Woman (File image)

दिल्ली (New Delhi) येथील पहाडगंज (Paharganj) भागात होळी खेळताना एका जपानी महिलेला (Japanese Woman) रंग लावल्याचा एक व्हिडओ व्हायरल ( Holi Viral Videos) झाला होता. हा व्हिडिओ जापानी महिलेनेच आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला होता. व्हिडओत (Molestation Videos) काही लोक तिला जबरदस्ती रंग लावताना दिसत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आघाडीच्या सेलिब्रिटी आणि राजकारण्यांसह नेटिझन्स भडकले. त्यांनी महिलेचा विनयभंग करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, सदर महिलेने हा व्हिडिओ ट्विटरवरुन हटवला आहे. तसेच, भारत आणि भारतातील उत्सवांबाबत प्रतिक्रियाही दिली आहे. ही प्रतिक्रिया या महिलेने ट्विटरद्वारे दिली आहे. तसेच भारत आणि जपान हे परस्परांचे नेहमीच तोमोडाची (Tomodachi) म्हणजेच मित्र असतील असेही म्हटले

सोशल मीडियावर अपलोड केलेल्या व्हिडिओ हटवल्यावर जपानी महिलेने इंडिया टुडेला प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत महिलेने म्हटले की, मी व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्याखाली आलेल्या प्रतिक्रिया आणि रिट्विट्स पाहून मी थक्क झाले. या महिलेने पुढे म्हटले की, भारतात होळीचा सण साजरा होत असताना मला संभाव्य धोक्यांची पूर्ण जाणीव होती. मी ऐकले होते की, होळीच्या दिवशी महिलांनी एटक्याने बाहेर जाणे खूपच धोकादायक असते. म्हणून मी माझ्या 35 मित्रांसोबत बाहेर गेले होते. मी उत्सवात भाग घेतला. (हेही वाचा, Holi 2023: पाण्याचा फुगा डोक्यात लागल्याने विलेपार्लेमध्ये 41 वर्षीय तरूणाचा मृत्यू)

ट्विटरवरुन प्रतिक्रिया देत महिलेने पुढे म्हटले की, होळीच्या सणादरम्यान मला काहीसा भयानक अनुभव आला. पण तरीही मला भारत आवडतो. भारतातील सण उत्सवांचे सौदर्य मला आवडते. त्यामुळे मी भारतावर प्रेम करते. मला भारताबद्दल सर्व काही आवडते. मी अनेकदा भारतात गेली आहे. तो एक आकर्ष आणि सूंदर देश आहे. भारत आणि जपान नेहमीच परस्परांचे 'टोमोडाची' (मित्र) राहतील.

दरम्यान, विदेशी महिलेसोबत झालेल्या प्रचंड टीकेनंतर पोलिसांनी कारवाईचे अश्वासन दिले आहे. सदर महिला भारतात आली होती आणि दिल्ली येथील पहाडगंज परिसरातील एका हॉटेलमध्ये थांबली होती. होळी संपल्यानंतर ही महिला बांगलादेशला रवाना झाली.