भीम आर्मी चीफ चंद्रशेखर यांची तिहार तरुंगातून सुटका; 16 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Jan 16, 2020 11:14 PM IST
आज के शिवाजी नरेंद्र मोदी (Aaj ke Shivaji Narendra Modi) पुस्तकावरुन झालेला वाद. त्यावर राजकीय पक्षांनी घेतलेल्या भूमिका. त्याचे पडसाद. भाजपची झालेली कोंडी. विविध संघटना, राजकीय नेते आदींनी केलेली मतमतांतरं यांवरुन गेले दोन दिवस राज्याच्या राजकारणात प्रचंड गदारोळ माजला आहे. त्यात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेली टीका. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी घेतलेली पत्रकार परिषद. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना (Shiv Sena) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेली टीका यावरुन हा वाद पुन्हा एकदा वाढला. उदयनराजे भोसले यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथील माण-खाटाव येथे तर, संजय राऊत यांनी पुणे येथे जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यावरुन पुन्हा एकदा राजकारणत तापले असून, भाजपने संजय राऊत यांच्यावर टीकेचा भडीमार केला आहे.
दुसऱ्या बाजूला राज्यातील शेतकऱ्यांची पीक विमा कंपन्यांकडू होणारी फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकारने स्वत:चीच सरकारी पीक विमा कंपनी काढण्याचा निर्णयावर मंत्रिमंडळ बैठकीत केलेला विचार. महावितरण कंपणीने तब्बल सहा हजार कोटी रुपयांची दरवाढीचा प्रस्ताव देऊन समान्य ग्राहकांना दिलेला झटका. राज्यात विविध ठिकाणी वाढलेली थंडी. त्याचा शेती, आरोग्य आणि पर्यावरण यांच्यावर होणारा परिणाम यांसह वाढती महागाई आणि शेअर बाजार, क्रीडा, अर्थकारण, राजकारण आणि उद्योगविश्वातील घडामोडींचा दिवसभारातील धांडोळा लेटेस्टलीच्या वाचकांना एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. (हेही वाचा, महाविकास आघाडी सरकारच्या शपथविधी सोहळ्यात 2 कोटी 79 लाखांचा खर्च)
दरम्यान, राज्य, देश यांसोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरही काय घडतंय.. काय बिघडतंय या सर्व गोष्टींवर लेटेस्टली नजर ठेऊन आहे. त्यामुळे अमेरिका-ईराण (US-Iran Conflict) यांच्यातील संघर्ष काय रुप घेतो आहे. प्रामुख्याने रशिया (Russia) येथे आज काय घडतं आहे? कारण इथे घटनादुरुस्ती प्रस्तावावर पेच निर्माण झाल्याने रशियाचे सरकारच विसर्जित झाले आहे. त्यामुळे इथले राजकारण कसे वळण घेते याकडेही लक्ष असणार आहे. सत्तासूत्र काय ठेवण्याची खेळी विद्यमान राष्ट्राध्यक्ष पुतीन (Vladimir Putin) यांना जमणार की कसे? या आणि यांसह दिवसभरात घडणाऱ्या ताज्या आणि ढळक घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा लेटेस्टली मराठी प्रयत्न करत आहे. म्हणूनच जोडलेले राहा लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग अपडेट सोबत.