मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळवणाऱ्या नव्या मंत्र्यांसाठी भाजप देशभर जन आशीर्वाद (Jan Ashirwad Yatra) यात्रा काढणार आहे. सरकारमध्ये समाविष्ट झालेले नवीन मंत्री 16 ऑगस्टपासून 20,000 किमीच्या यात्रेवर निघणार आहेत. या यात्रेद्वारे केंद्रातील नवे मंत्री जनतेकडून आशीर्वाद घेतील. या मंत्र्यांनी त्यांच्या प्रवासाचे वेळापत्रक 3 ते 7 दिवसांचे निश्चित केले आहे. या यात्रेअंतर्गत खासदार त्यांच्या लोकसभा मतदारसंघाव्यतिरिक्त आणखी तीन संसदीय जागांना भेट देतील. याशिवाय 4 जिल्ह्यांमध्ये जातील. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांनी ही माहिती दिली.
या यात्रेचा आराखडा देखील मंत्र्यांनी नव्हे तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तयार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या मंत्र्यांची सभागृहात ओळख करून देणार होते, मात्र तेव्हा प्रचंड गोंधळामुळे ते तसे करू शकले नाहीत. यानंतर त्यांनी मंत्र्यांना अशी यात्रा करण्याचे आदेश दिले. या यात्रेचा आराखडा तयार करण्यासाठी नुकतेच भाजप प्रमुख जेपी नड्डा यांनी सर्व नवीन मंत्र्यांची भेट घेतली.
या यात्रेअंतर्गत राज्यमंत्री 16 ऑगस्टपासून आपला कार्यक्रम सुरू करतील. त्याचबरोबर कॅबिनेट दर्जाचे मंत्री 19 ऑगस्टपासून यात्रेवर निघतील. तरुण चुग म्हणाले की, या यात्रेमधील सर्वात लहान प्रवास तीन दिवसांचा असेल आणि काही मंत्र्यांचा 7 दिवसांचा प्लॅन आहे. अशाप्रकारे, हा प्रवास एकूण 142 कामकाजेचे दिवस असेल. सध्या बिश्वेश्वर ट्यूडर हे मंत्री आजारी आहेत. अशा परिस्थितीत उर्वरित 39 मंत्री 22 राज्यांमध्ये 19567 किमी प्रवास करतील. या यात्रेअंतर्गत मंत्री 1,663 प्रमुख कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील.
तसेच ते धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणी जातील. राष्ट्रीय योद्ध्यांना श्रद्धांजली वाहतील आणि जनतेला संबोधित करतील. दरम्यान. राज्य सरकारांशी चर्चा करून मंत्र्यांच्या प्रवासाचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील नारायण राणे 7 दिवसांच्या यात्रेला जाणार आहेत. याशिवाय बंगालमधील मंत्री सुभाष सरकार 5 दिवसांचा प्रवास करतील. मंत्र्यांची ही यात्रा कोणत्या मार्गाने होईल हे राज्यांनी ठरवले आहे. नवे रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव रेल्वेने ओडिशाला जातील. तर किरेन रिजिजू चॉपरमधून यात्रेला निघतील.