जम्मू-काश्मीर: शोपियाँ जिल्ह्यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षारक्षकांना यश
Security forces in Jammu and Kashmir | File image | (Photo Credits: IANS)

जम्मू काश्मीर ( Jammu & Kashmir) येथील शोपियाँ जिल्ह्यात सोमवारी (3 जून) सुरक्षारक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. मोलू चित्रगाम परिसरात (Molu-Chitragam area) काही दहशतवादी लपलेले असल्याची माहिती सुरक्षारक्षकांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी सर्च ऑपरेशनला सुरुवात केली. दहशतवाद्यांनी सुरक्षारक्षकांवर गोळीबार सुरु केला. गोळीबारानंतर दहशतवाद्यांना सुरक्षारक्षकांनी चोख उत्तर देण्यास सुरुवात केली. यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षारक्षकांना यश आले.

ANI ट्विट:

पुलवामा येथे शुक्रवारी कंठस्नान घालण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक पाकिस्तानी होता. हे दोघेही दहशतवादी जैश-ए-मोहम्मद शी संबंधित होते. दक्षिण काश्मीरच्या अवंतीपुरा परिसरातील मीदूरा येथे झालेल्या चकमकीत देखील दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.

पाच महिन्यांपूर्वी काश्मीरमध्ये 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. 2019 मध्ये 31 मे पर्यंत 101 दहशतवादी मारले गेले होते. यात अल-कायदाशी संबंधित अंसार घजवत-उल-हिंद चे प्रमुख जाकिर मूसा यांसारख्या सुत्रधारांचाही समावेश आहे.