Indian Army (Photo Credits-IANS)

जम्मू-कश्मीर येथील नौशेरा येथे सुरु असलेल्या सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात 2 जवान शहीद झाले आहेत. असे सांगितले जात आहे की, दहशतवाद्यांनी घुसखोरी करत गोळीबार करत हल्ला केला. संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला असून सर्च ऑपरेशन अद्याप सुरु आहे.

अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पाकव्याप्त काश्मीर येथून दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय सेनेचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टिनेंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी असे सांगितले की, नौशेरा सेक्टर येथे घेराव आणि सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आल्यानंतर दोन जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्च ऑपरेशन तातडीने सुरु करण्यात आले. नौशेरा येथे मोठे अभियान सुरु करण्यात आले आहे. तर काही दिवसांपूर्वीच नौशेरा येथे पाकिस्तान कडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. त्यावेळी सुद्धा भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रतिउत्तर देण्यात आले होते.(नौदलाकडून नौदल तळ आणि युद्धनौकांवर स्मार्ट फोनसह सोशल मीडियावर बंदी) 

ANI Tweet:

मंगळवारी जम्मू-कश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी असे सांगितले आहे की, केंद्र शासित प्रदेशात 2019 या वर्षात 160 दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. तसेच 102 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी असे ही सांगितले की, दहशतवादी संघटनेत सहभागी होणाऱ्या स्थानिक तरुणांच्या संख्येत घट झाली आहे.