Jammu-Kashmir: श्रीनगर येथे कश्मीरी हिंदू औषध व्यापाऱ्यासह तीन नागरिकांची हत्या
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

Jammu-Kashmir: दहशतवाद्यांकडून मंगळवारी संध्याकाळच्या वेळेस श्रीनगर येथे आणखी दोन नागरिकांची गोळ्या घालून हत्या केली आहे. यामध्ये एक स्थानिक हिंदू औषध व्यापारी असून दूसरा अन्य राज्याचा नागरिक आहे. या व्यतिरिक्त बांडोपोर मधील शाहगुंड परिसरात सुद्धा एका स्थानिकावर गोळीबार करत हत्या करण्यात आली आहे. हल्ल्याच्या नंतर तातडीने सुरक्षा जवानांनी परिसराला घेराव घालत तपास सुरु केला. दहशतवादी या परिसरात लपून बसल्याची शक्यता व्यक्त केली जात आगे. दोन दिवसात दहशतवाद्यांनी या प्रकारे चार लोकांचा जीव घेतला आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, श्रीनगर मधील इकबाल पार्काच्या जवळ दहशतवाद्यांनी मंगळवारी संध्याकाळी सात वाजल्याच्या सुमारास एक प्रसिद्ध बिंदरु केमिस्ट शॉपमध्ये घुसरत तेथे अंधाधुंद गोळीबार सुरु केला. दहशतवाद्यांनी 68 वर्षीय हिंदू औषध व्यापारी मक्खन लाल बिंदरु यांना निशाणा बनवत गोळीबार केला. यामध्ये बिंदरु यांना काही गोळ्या लागल्या. या प्रकारानंतर आजूबाजूला गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. दहशतावाद्यांनी पळ काढल्यानंतर लोकांना बिंदरु यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. पण त्यांना तेथे मृत घोषित करण्यात आले.(Thefts Case: देशभरातील सुमारे 500 चोरी प्रकरणात सहभाग असणा-या तरूणाला अटक, पोलिसांनी 'असा' रचला सापळा)

Tweet:

या हल्ल्याच्या काही वेळानंतर दहशतवाद्यांनी लाल बाजारात पाणीपुरी विक्रेत्यावर ही हल्ला करत त्याची ही हत्या केली. तो दुसऱ्या राज्याचा नागरिक होता. मात्र त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. तिसरे म्हणजे बांडीपोर येथे शाहगुंड येथील हाजिन मधील मोहम्मद शफी यांची सुद्धा गोळीबार करत हत्या करण्यात आली.

Tweet:

दरम्यान, श्रीनगर सारख्या गर्दीच्या ठिकाणी दहशतवाद्यांनी दोन दिवसाच्या आतमध्ये चार नागरिकांचा जीव घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी श्रीनगर येथीलच करण बाग आणि बटमालू मध्ये काही वेळापर्यंत दोन तरुणांवर गोळीबार करत हत्या करण्यात आली होती. तसेच आज संध्याकाळी सुद्धा पुन्हा एकदा दोन नागरिकांना मारले आहे.