जम्मू-कश्मीर मधून कलम 370 हटवल्यानंतर आता श्रीनगर सचिवालायवर फडणकार तिरंगा
श्रीनगर सचिवालय ( Photo Credits-ANI)

जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) मधूल कलम 370 हटवल्यानंतर श्रीनगर (Srinagar) सचिवालयावरील राज्याचा झेंडा हटवण्यात आला आहे. सचिवालयावर आता राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. गेल्या आठवड्यात सचिवालायावर दोन्ही झेंडे एकत्र फडकत असताना दिसून आले.आता सर्व सरकारी ऑफिसांमध्ये राष्ट्रध्वज फडकवला जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने इंडिया टुडेशी बोलताना म्हटले आहे. जम्मू-कश्मीर मधून कलम 370 रद्द केल्याने या राज्यांना देण्यात आलेला विशेष राज्यांचा दर्जा काढून टाकण्यात आला आहे.

या राज्याचे स्वतंत्र संविधान, झेंडा आणि दंड संहिता होती. परंतु कलम 370 रद्द केल्याने जम्मू-कश्मीरसाठी भारतीय संविधान लागू करण्यात आले आहे. सरकारी ऑफिसांवर भारताचा झेंडा फडकवला जाणार आणि भारतीय दंड संहितेचे सुद्धा येथे पालन केले जाणार आहे. राज्यात कोणत्याही बाहेरील देशातील नागरिकाला येथे जमीन खरेदी करण्यासाठी पूर्णपणे मनाई होती. परंतु हा नियम सुद्धा आता रद्द करण्यात आला आहे. तर मोदी सरकारने जम्मू-कश्मीर आणि लद्दाख यांना दोन वेगवेगळ्या केंद्रशासित प्रदेशात विभागले आहे. त्यामुळे कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-कश्मीरचे स्वरुप पूर्णपणे बदलले आहे. त्याचसोबत राज्यपाल आता केंद्र शासित जम्मू-कश्मीर आणि केंद्र शासित लद्दाखचे उपराज्यपाल असणार आहेत. तसेच विधानसभेचा कार्यकाळ हा 6 वर्ष नाही तर 5 वर्ष करण्यात आला आहे.(केंद्रशासित प्रदेश बनलेल्या जम्मू कश्मीर, लद्दाख मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन 2019 चं दणक्यात सेलिब्रेशन)

कलम 370 हटवण्याचा निर्णय घेणे हे फार आव्हानात्मक होते. परंतु सुरक्षा व्यवस्था पाहून घाटी येथे 35 हजारपेक्षा अधिक सुरक्षा बलाचे जवान तैनात करण्यात आले होते. त्यानंतर कलम 370 हटवल्याच्या निर्णयावर मंजूरी मिळताच येथील रस्ते, टेलिफोन सेवा, शाळा-महाविद्यालये पुन्हा सुरु करण्यात आली आहेत.