प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

जम्मू काश्मीर (Jammu-Kashmir) येथील पुलवामा (Pulwama) जिल्ह्यात शुक्रवार पासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. या चकमकीत जवानांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पुलवामाच्या लस्सीपोरा येथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांकडे AK सीरिज मधील तीन रायफल्स जप्त सापडल्या आहेत. तर सध्या जवानांकडून दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणी शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे.

पोलिसांना सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुलवामा मधील पंजरान परिसरात जवानांनी घेराव घालून दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तर शोध मोहिमेवेळी दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर जवानांनीसुद्धा त्यांच्या बाजूने गोळीबार सुरु केला. दरम्यान या सर्व प्रकरणापूर्वी बुधवारी दहशतवाद्यांनी एका महिलेला गोळी मारल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तसेच एक व्यक्ती त्यावेळी गंभीर जखमी सुद्धा झाला.

(पुलवामा मध्ये आतंकवाद्यांचा पुन्हा एकदा निर्दयी हल्ला, 'रमजान ईद'च्या दिवशी मुस्लिम महिलेची गोळी घालून हत्या)

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यात बुधावरी सिंगू-नरबाल परिसरात एक महिला आणि पुरुषावर गोळीबार केला. त्यामध्ये दोघे गंभीर जखमी होत महिलेचा मृत्यू झाला. त्याचसोबत काश्मीर घाटी येथे 31 मे पर्यंत विविध दहशतवाद्यांच्या संघटनांवर जवानांनी सुरु केलेल्या अभियानामुळे आतापर्यंत 100 पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेले आहेत.