जम्मू-कश्मीर: दहशतवाद्यांसोबत संबंध ठेवल्याच्या प्रकरणी निलंबित पोलीस DSP देवेंद्र सिंह याच्या विरोधात NIA कडून चार्जशीट दाखल
डीएसपी देवेंद्र सिंह ( फोटो क्रेडिट- IANS )

दहशतवाद्यांसोबत संबंध ठेवल्याच्या प्रकरणी जम्मू-कश्मीर मधील निलंबित डीएसपी देवेंद्र सिंह याला दिल्लीतीली एका कोर्टाने जामीन दिला होता. निलंबित पोलीस डीएसपी जौर आणि त्यांचे सहयोगी इरफान शफी मीर यांना सुद्धा जामीन दिला होता. देवेंद्र सिंहला कोर्टाकडून भले जामीन दिला होता तरीही एनआयएच्या ताब्यात हे सर्वजण होते. एनआयए यांनी निलंबित डीएसपी देवेंद्र सिंह याच्यासह हिज्बुल मुजाहिदीनच्या 6 लोकांच्या विरोधात एनआयए यांनी चार्जशीट दाखल केले आहे.

निलंबित डीएसपी देवेंद्र सिंह याला दिल्लीच्या एका कोर्टाने जामीन दिला होता. मात्र एनआयए यांनी असे म्हटले होते की, सर्वांच्या विरोधात पर्याप्त पुरावे आहेत. लवकरच सर्वांच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात येणार आहे. देवेंद्र सिंह याच्या प्रकरणी एनआयए यांनी सिंह याच्या व्यतिरिक्त आणि काही लोकांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. ज्यामुळे हिज्बुल दहशतवादी सैय्यद नवीद, रफी अहमद आणि इरफान सफी मीर यांच्या नावांचा समावेश आहे.('Sikhs for Justice' या खलिस्तान समर्थक संघटनेवर सरकारची मोठी कारवाई;  40 वेबसाइट्सवर घातली बंदी)

पोलिसांनी जम्मू कश्मीर ते दक्षिण कश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातून 13 जानेवारीला श्रीनगर जम्मू नॅशनल हायवे वर एका कारमध्ये सिंह याला पाहिले होते. सिंह हा चंदीगढ आणि दिल्लीत दहशतवाद्यांसाठी राहण्याची व्यवस्था करणार होता.