![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/03/Brothers-rape-minor-sisters-in-Nagpur_ac-380x214.jpg)
श्रीनगर (Srinagar) येथे एका वडिलांनीच आपल्या पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीने आत्महत्या केली आहे. घडलेला प्रकार कोणाला ही कळला असता तर वडिलांनी मुलीला मारले असते असे मृत मुलीच्या बहिणीने सांगितले आहे.
काश्मीरमधील बांदीपोरा येथे ही घटना घडली आहे. पीडित वडिलांनी मुलीवर कथित स्वरुपात बलात्कार केला. त्यामुळे पीडित मुलीने विष पिऊन आत्महत्या केली आहे. यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची माहिती न्यूज 18 ने दिली आहे.(हेही वाचा-गोरखपूर येथे हुंड्यासाठी सुनेला जिवंत जाळले, घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद (Video)
तर पोलिसांत घरतील मंडळींनी तक्रार केली आहे. तसेच पीडित मुलीच्या बहिणीने पोलिसांना असे सांगितले की, तिचे काकासुद्धा त्यांच्या मुलीवर बलात्कार करता हे वडिलांना कळाले होते. त्यानंतर वडिलांनी बहिणीवर सुद्धा बलात्कार करण्यास सुरुवात केली. परंतु पीडित मुलगी वडिलांसमोर असा प्रकार करताना रडत असे तेव्हा वडिल तिला जीवे मारण्याची धमकी देत असत असे बहिणीने सांगितले आहे.