जम्मू-काश्मिर येथे 24 तासात दहशतवादी लष्कर कमांडर अलीसह 5 जणांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश
भारतीय सेना (Photo Credit: PTI)

जम्मू-काश्मिर (Jammu-Kashmir)  येथे गेल्या 24 तासापासून दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु करण्यात आल्याची 4 प्रकरणे समोर आली आहेत. तर शोपिया येथील इमान साहब मध्ये गोळीबार सुरु असून 2-3 दहशतवादी एका घरात लपून बसले असल्याचे सांगितले जात आहे. तर बंदीपोरा येथील गोळीबारादरम्यान लष्कर -ए- तय्यबा संघटनेचे 2 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. त्यामध्ये लष्कराचा मुख्य कमांडर अली भाई सुद्धा ठार झाला आहे.

याप्रमाणे बारमूला जिल्हात गुरुवारी गोळीबार दहशतवाद्यांकडून करण्यात आला. त्यामध्ये 2 दहशतवादी मारले गेले. तसेच शोपिया येथे एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. या चारही गोळीबारातील प्रकरणात पाच एकूण 5 दहशतवादी मारले गेले आहेत. परंतु या गोळीबारादरम्यान एक अधिकाऱ्यासह तीन जवान जखमी झाले आहेत.

ANI ट्वीट:

अली भाई हा पाकिस्तान मधील असल्याचे सांगण्यात येत आहे. श्रीनगर येथील रक्षा प्रवक्ते कर्नल कालिया यांनी असे सांगितले की, बारामूला येथील कलंतरा भागात नमबलनार अभियानाच्या येथून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. तसेच अद्याप गोळीबार सुरु असून भारतीय जवान दहशतवाद्यांना प्रतिउत्तर देत असल्याचे ही कालिया यांनी म्हटले आहे.