Deputy Superintendent of Police Aman Kumar Thakur (Photo Credits: Twitter)

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मिर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. आज पुन्हा कुलगाम (Kulgam) येथे लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला यश आलं आहे. पण कारवाईदरम्यान डीएसपी अमन ठाकूर ( Aman Kumar Thakur ) शहीद झाले असून लष्कराचा मेजर, 2 जवान आणि 2 नागरिक जखमी झाले आहेत. ठाकूर यांच्यासोबतच एक पोलीस अधिकारी देखील शहीद झाला.

पुलवामा येथील दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर आता लष्करानं दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन सुरु आहे. यापूर्वी पुलवामा येथे झालेल्या कारवाईमध्ये देखील तीन दहशतवाद्यांचा ठार करण्यात आले. त्यावेळी 4 जवान शहीद झाले होते.शुक्रवार रात्री पासूनच फुटीरतावाद्यांना अटक करण्यास सुरुवात झाली आहे. निमलष्करी दलाच्या 100 तुकड्या देखील काश्मीरमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. उद्या काश्मीरमध्ये काही ठिकाणी निवडणुका होणार आहेत.