Jammu-Kashmir येथे दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद
दहशतवादी हल्ला (फोटो सौजन्य- ANI)

Jammu-Kashmir : काही दहशतवाद्यांनी जेनपरा (Zainapora) येथील पोलीस चौकीवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पोलीस दलाचे तीन जवान शहीद झाल्याची घटना घडली आहे. तर दहशतवाद्यांनी स्थानिक परिसरातून पळ काढला असून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे.

शोपियाँ (Shopian) जिल्ह्यातील पोलीस चौकीवर काही दहशतवाद्यांनी दुपारी हल्ला केला. त्यावेळी चौकीबाहेर पाहाऱ्यासाठी उभ्या असलेल्या तीन जवानांनवर दहशतवद्यांनी हल्ला केला.  या प्रकरणी तीन जवानांचा मृत्यू  झाला आहे. तसेच अजून एका पोलीस कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे वृत्त समोर येत आहे.

तसेच 9 डिसेंबर रोजी सुद्धा श्रीनगरच्या मुजगुंड येथील परिसरात दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमक झाली. त्यावेळी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास भारतीय जवानांना यश आले होते.