जम्मू कश्मीर: कुलगाम भागात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक;  4 दहशतवादी ठार
Security forces in Jammu and Kashmir (Photo Credits: IANS)

जम्मू कश्मीर मधील कुलगाम (Kulgam) येथे मागील 12 तासांपासून सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दरम्यान याबाबत कश्मिर झोन पोलिसांनी ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. दरम्यान दहशतवाद्यांकडून लोअर मुंडा (Lowermunda) भागात हल्ला करण्यात आला त्यानंतर भारतीय सुरक्षा जवानांकडूनही त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. या चकमकीमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे.

दरम्यान काल रात्री सीआरपीएफच्या जवानांच्या patrol party वर हल्ला करण्यात आला. यावेळेस भारतीय लष्कर आणि पोलिसांचेही नुकसान झाले. सीआरपीएफच्या टीमला दहशतवादी कारवायांची टीप मिळाली होती. त्यामुळे त्यांचा सामना करण्यासाठी पॅट्रोल टीम तेथे दाखल झाली.

ANI Tweet

PTI च्या रिपोर्ट्सनुसार, आजच्या कारवाईनंतर आता एप्रिल 2020 मध्ये दहशतवादी ठार झालेल्यांची संख्या 26 वर पोहचली आहे. दरम्यान यावर्षी आत्तापर्यंत 58 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे.