दक्षिण काश्मीर येथील शोपिया जिल्ह्यात भारतीय लष्कर (Indian Army) आणि दहशतवाद्यांच्यात चकमक झाली. या वेळी भारतीय लष्कराच्या जवानांनी 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला. कश्मीर Kashmir) पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी आयएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, बुधवारी सकाळी सुगू गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.
पोलिसांनी सांगितले की, सुगू गावात दोन दहशतवादी लपल्याची माहिती त्यांना गुप्तचरांकडून मिळाली होती. त्यानतर भारतीय लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत नाकाबंदी केली आणि सापळा रचला. लष्कराच्या जवानांनी आपली कारवाई अधीक तीव्र करताच दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. या चकमकीत हिजबूल मुजाहीद्दीन आणि लष्कर ये तोयबा या दहशतवादी संघटनेचे पाच दहशतवादी मारले गेले. (हेही वाचा, जम्मू कश्मीर: शोपियां भागात चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये सुरक्षा जवानांना यश; सर्च ऑपरेशन सुरू)
एक आठवड्यापेक्षाही कमी कलावधीत शोपिया जिल्ह्यात झालेली ही तिसरी चकमक आहे. या आधी सोमवारीही शोपिया जिल्ह्यातील पिंजुरा गावात चार दहशतवादी मारले गेले होते.