Indian Army | (File photo)

जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) अनंतनाग (Anantnag) जिल्ह्यात सुरक्षा दलाने तीन अज्ञात दहशतवाद्यांना गोळ्या घालून सोमवारी ठार मारले. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील खुलचोहर भागात दहशतवाद्यांविषयी माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली होती. दहशतवाद्यांनी शोध पथकावर गोळीबार केल्यावर त्याचे रुपांतर चकमकीत झाले. दरम्यान,चकमक अद्यापही सुरू असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटू शकली नाही.

प्राप्त माहितीनुसा, अनंतनाग येथील कुलचोहर प्रिसरात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच जम्मू कश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कर यांनी संयुक्त मोहीम राबवली. कश्मीर पोलीसांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि लष्कराचे जवान यांची शोधमोहीम अद्यापही सुरुच आहे आणि त्याचसोबत चकमकही सुरु आहे.

गेल्या काही दिवसांपासून लष्कर आणि जम्मू कश्मीर पोलीस यांच्या निशाण्यावर हिजबूल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी निशाण्यावर आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी राबवलेल्या शोधमोहीमेत अनेक अतिरेक्यांचा खात्मा केला जाता आहे.

दरम्यान, लष्काराने या आधीही पुलवामा जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांना शुक्रवारी (26 जून) ठार मारले होते. दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच जवानांनी कश्मीर जिल्ह्यातील त्राल येथील चीवा उलार परिसरात नाकाबंदी करुन शोधमोहीम सुरु केली होती.