Representational Image (Photo Credit: PTI)

पाकिस्तानी सैन्याने (Pakistan Army)पुन्हा एकदा शस्त्रसंधी उल्लंघन (Ceasefire Violation)केले आहे. पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीर मध्ये पुंछ (Poonch) परिसरात गोळीबारी केली. भारतीय सैन्य (Indian Army) पाकिस्तानच्या नापाक हरकतीला तोडीस तोड प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, 6 नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारानंतर स्थानिक नागरिकांमध्ये (Local People) तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानकडून पुंछ जिल्ह्याच्या शहापूर आणि केरनी सेक्टर येथे गोळीबार करण्यात आला.

पाकिस्तानकडून केला जाणारा गोळीबार गेली 24 तास थोड्या थोड्या वेळाने थांबून केला जात आहे. LoC नजीक असलेल्या नागरी परिसरातही पाकिस्तानकडून गोळीबार केला जात आहे. भारतीय सैन्य पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. भारतीय संरक्षण प्रवक्ता (Indian Defence Spokesperson) द्वारा प्राप्त माहितीनुसार मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास दोन सेक्टरमध्ये गोळीबार झाला. गोळीबारामुळे परिसारत काही काळ तणावही निर्माण झाला आहे. (हेही वाचा, 'जैश-ए-मोहम्मद'ची मोठ्या हल्ल्याची तयारी; संदेशासाठी केला 'डार्क वेब'चा वापर)

एएनाय ट्विट

दरम्यान, जखमी नागरिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर भारतीय सैन्याने नियंत्रण रेषा (Line of Control) परिसरात अलर्ट जारी केला आहे. तसेच, ग्रामीण भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.