Alwar Thanagazi Rape Case: अलवार थानागाजी सामूहिक बलात्कार (Gang-Rape) प्रकरणाचे पडसाद आता राजस्थान पासून ते दिल्लीपर्यंत उमठू लागले आहेत. राजस्थानची राजधानी जयपूर येथे भाजपने या प्रकरणावरुन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या प्रकरणाकडे लक्ष वेधनण्यासाठी भाजप ( BJP ) समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठौड (Rajyavardhan S Rathore) , भाजपा प्रदेशाध्यक्ष मदन लाल सैनी, पूर्व मंत्री राजेन्द्र सिंह राठौड, राजपाल सिंह, विधायक अशोक लाहौटी, नरपत सिंह राजवी, माजी आमदार सुरेंद्र पारीक, कैलाश वर्मा, शैलेन्द्र शर्मा यांच्यासह स्थानिक नागरिकही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
आंदोलकांनी पीडित कुटुंबियांना योग्य ती भरपाई, प्रकरणाची सीबीआय चौकशी आणि थानागाजी पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, स्थानिक प्रसारमाध्यांच्या वृत्तानुसार भाजपने या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन आणि राज्यपालांच्या नावे चौकशीसाठी पत्र पाठवणे असा कार्यक्रम बुधवारीच निश्चित केला होता. (हेही वाचा, Rajasthan Alwar Gangrape: नवऱ्यासमोर बायकोवर बलात्कार करुन अश्लिल व्हिडिओ व्हायरल, पोलिसांवर प्रकरण दडपल्याचा आरोप)
Jaipur: BJP delegation led by Union Min Rajyavardhan S Rathore holds protest at Collector office over Alwar gang-rape incident. Rathore says, "There has been police inaction in the case. After prior appointment, we came to meet Collector but he is not present at the office." pic.twitter.com/t4Eb0xlyYz
— ANI (@ANI) May 9, 2019
भाजप प्रदेशाध्यक्ष मदन लाल सैनी ( Madan Lal Saini) यांनी तसेच, रामकुमार वर्मा, ज्योति किरण आदी मंडळींनी भाजपच्या वतीने सांगितले पत्रकारांना सांगितले की, हे प्रकरण इतके गंभीर आहे की, पीडित पतीपत्नी जोपर्यंत जिवंत असतील तोपर्यंत क्षणाक्षणाने मरत राहतील. पोलीस अधीकांवर कारवाईचे नाटक करुन सरकार या प्रकरणातून आपली सूटका करु पाहात आहे. परंतू, या प्रकरणाचा तपास करण्यात पोलीसांनी पूर्णपणे टाळाटाळ केली आहे, असा आरोप करतानाच भाजपने या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणी केली आहे.