Vice President Elections: उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी देशात आज मतदान, एनडीएचे जगदीप धनखड विरुद्ध युपीएच्या मार्गारेट अल्वा यांच्यात सामना
Margaret Alva,Jagdeep Dhankhar, | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

उपराष्ट्रपती पदासाठी देशात आज (6 ऑगस्ट) निवडणूक (Vice President Elections) पार पडत आहे. भाजप प्रणित एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड विरुद्ध काँग्रेस प्रणित यूपीएचे उमेदवार मार्गारेट अल्वा (Jagdeep Dhankhar vs Margaret Alva) यांच्यात हा सामना रंगत आहे. सुरुवातीपासूनच जगदीप धनखड यांचे पारडे जड मानले जात आहे. असे असले तरी लोकशाहीमध्ये आणि राजकारणात काहीही घडू शकते. जगदीप धनखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. त्यांना राज्यपाल पदावरुन थेट उपराष्ट्रपती पदावर संधी देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या निवडणुकीतही मतदार पक्षाच्या निर्णयानुसार मतदान करणार की, याही वेळी क्रॉस वोटींग होणार याबाबत उत्सुकता आहे.

भाजपचे पारडे सुरुवातीपासूनच जड आहे. परंतू, विरोधकांमध्ये अद्यापही विरोधाभासाचे वातावरण आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात काँग्रेस हा पहिल्या क्रमांकाचा विरोधी पक्ष आहे. काँग्रेसकडे 36 खासदार आहेत. तर ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल असताना ममता बॅनर्जी यांच्या सरकारसोबत त्यांचा नेहमीचा संघर्ष सर्वश्रूत आहे. असे असतानाही ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलने उपराष्ट्रपती पदासाठी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा, Rahul Gandhi On Central Govt: देशात लोकशाहीची रोज हत्या होत आहेत, राहुल गांधींनी मोदी सरकारवर डागली तोफ)

दुसऱ्या बाजूला आम आदमी पार्टी (AAP), टीआरएस, AIMIM आणि JMM या पक्षांनी मार्गारेट अल्वा यांना पाठींबा देणयाची घोषणा केली आहे. बीएसपी आणि टीडीपी यांनी धनकड यांना पाठिंबा दर्शवला आहे. वायएसआरसीपी आणि बीजेडी या पक्षांनी अल्वा यांना पाठिंबा दर्शवला आहे.

आज सकाळी 10 वाजलेपासून सांयकंकाळी 5 वाजेपर्यंत उपराष्ट्रपती पदासाठी मतदान पार पडणार आहे. मार्गारेट अल्वा या काँग्रेसच्या 80 वर्षीय जेष्ठ नेत्या आहेत. या आधी त्यांनी विविध पदे भूषवली आहेत. याशिवाय त्या केंद्रीय मंत्री आणि राज्यपालही राहिल्या आहेत. तर धनकड हे 71 वर्षांचे आहेत. त्यांनी मूळचे राजस्थानचे आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात समाजवादातून झाली. पुढे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते नामवंत वकीलही राहिले आहेत.