Jagannath Temple | File image | (Photo Credits: PTI)

भारतामध्ये कोरोना व्हायरसची (Coronavirus) स्थिती पाहता मागील तीन महिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सध्या याच पार्श्वभूमीवर आज सर्वोच्च न्यायालयाने भगवान जगन्नाथ यांच्य रथयात्रेला स्थगिती दिली दिली आहे. ही यात्रा यंदा 23 जूनला नियोजित होती. मात्र देशातील कोरोनाचं जागतिक आरोग्य पाहता यंदा या भव्य यात्रेची परंपरा खंडित होणार आहे. कोव्हिड 19 च्या संकटात कोर्टानं रथ यात्रेला परवानगी दिली तर भगवान जगन्नाथ (Lord Jagannath) आम्हाला क्षमा करणार नाही, असं मत निर्णय देताना सरन्यायाधिश एस.ए. बोबडे यांनी व्यक्त केले आहे.

ANI Tweet

23 जून पासून पुढील 20 दिवस ही यात्रा सुरू राहणार होती. या यात्रेला दरवर्षी प्रमाणे लाखो भाविक येण्याची शक्यता होती. अशावेळी भारतात आधिच कोरोनाचं संकट गडद असताना त्याचा फैलाव अशा सामुहिक कार्यक्रमामुळे वाढण्याची भीती आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने यंदा ही रथयात्रा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

जगन्नाथ पुरी रथ यात्रा हा वार्षिक सोहळा आहे. दरवर्षी आषाढ शुक्ल द्वितियाला त्याची सुरूवात होते. दरम्यान यंदा 23 जूनला त्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या यात्रेसाठी मोठी तयारी देखील सुरू होती. मात्र काही संघटनांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेत कोरोना संकटकाळात ही यात्रा यंदा रद्द करावी अशी मागणी केली होती. दरम्यान मागीलवर्षी या यात्रेमध्ये 10 लाख लोकांनी सहभाग घेतला होता.