दिल्लीच्या ITC Maurya या फाईव्ह स्टार हॉटेल मधील सलोनमध्ये हेअर कट मधील चूकीमुळे कोर्टाने त्यांना 2 कोटींच्या दंडाचे आदेश दिले आहे. National Consumer Disputes Redressal Commission (NCDRC)कडून आदेश देताना महिलेला हेअर प्रोफेशनल कडून झालेल्या चूकीमुळे मेंटल ट्रॉमाचा सामना करावा लागत असल्याचं सांगत 2 कोटी नुकसान भरपाई देण्यास सांगितलं आहे.
तक्रारदार महिला 42 वर्षीय असून 18 एप्रिल 2018 दिवशी ती एका मह्त्त्वाच्या मुलाखतीपूर्वी हॉटेलच्या सलोनमध्ये गेली. यावेळी तिने समोरच्या बाजुला फ्लिक्स आणि केसांना खालच्या बाजूला 4 इंचाचं ट्रीम सांगितलं होतं. पण तरीही हेअर ड्रेसरने त्यापेक्षा जास्त केस कापले. महिलेला केस कापताना डोकं खालच्या बाजूला झुकवायला आणि चष्मा काढून ठेवायला सांगितलं त्यामुळे ती स्वतःला आरशामध्ये वेळीच पाहू शकली नाही. हेअर ड्रेसरने केस कापल्यानंतर केस मोठ्या मुश्किलीने खांद्याला पोहचत होते असा आरोप महिलेचा आहे.
दरम्यान सलोन कडून माफी मागताना तिचा सर्व्हिस चार्ज माफ केला पण संबंधित व्यक्तीवर कोणतीही कारवाई केली नाही. तक्रारीमध्ये जनरल मॅनेजरने देखील चूकीचं वर्तन केल्याचा आरोप आहे. या पुढे तिने आयटीसी च्या वरिष्ठांसोबत संबंधित घटनेची माहिती दिली त्यावर महिलेला मोफत एक्सटेंशन आणि ट्रीटमेंटची ऑफर देण्यात आली होती पण त्यावेळी देण्यात आलेल्या सेवेमध्येही निष्काळजीपणा दाखवण्यात आल्याचा महिलेचा आरोप आहे.
हेअर ट्रीटमेंटच्या वेळेस अति अमोनियामुळे केस आणि टाळूचं नुकसान झालं, टाळूवर इरिटेशनचा त्रास झाला अशी तक्रार तिने हॉटेलच्या सलोन विरूद्ध नोंदवली. (नक्की वाचा: पहिल्यांदाच तेजस एक्सप्रेस उशिरा, प्रवाशांना मिळणार 250 रुपये नुकसान भरपाई).
कोर्टाच्या आदेशानुसार, संबंधित तक्रारदार महिला मॉडेल होऊ इच्छित होत होती. तिने VLCC,Pantene सारख्या ब्रॅन्डसाठी मॉडेलिंग केले आहे. पण आता लांब केस नसल्याने तिच्या स्वप्नांवर पाणी फिरलं आहे. कोर्टाच्या आदेशामध्ये नमूद केलेल्या निकालपत्रामध्ये या घटनेचा महिलेच्या कामावर परिणाम झालाच आहे पण तिला मानसिक त्रास देखील झाला आहे. काम देखील गमावण्याची नामुष्की तिच्यावर ओढावली आहे.
महिलेची मानसिक स्थिती आणि लॉस पाहता कोर्टाने ITC Maurya ला 2 कोटी नुकसान भरपाईची रक्कम देण्याचं म्हटलं आहे.