Tejas Express (Photo Credits: ANI)

देशात नुकतीच सुरु झालेली तेजस एक्सप्रेस शनिवारी पावणे तीन तास उशिराने पोहचली. त्यामुळे अटीनुसार IRCTC च्या प्रत्येक प्रवाशाला याची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. आयआरसीटीसीचे प्रवक्ता सिद्धार्थ सिंह यांनी असे म्हटले आहे की, जसे आम्ही आधीपासूनच ठरवले होते की जर ट्रेन उशिरा आल्यास प्रवाशांना त्याची नुकसान भरपाई देण्यात येईल. तर लखनौ येथून सुटणारी तेजस एक्सप्रेस सकाळी 6.10 मिनिटांऐवजी सकाळी 9.55 मिनिटांनी सुटली. यामुळे कानपुरच्या रेल्वेरुळांसंदर्भात काही समस्या आल्याने एक्सप्रेस उशिराने सोडण्यात आली. परंतु या एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला 250 रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

आयआरसीटीसीने असे सांगितले की, नुकसान भरपाई मिळवण्यासाठी प्रवाशाला आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर जाऊन क्लेम करावा. तसेच आयआरसीटीसीकडून प्रवाशांच्या मोबाईल क्रमांकावर एक लिंक पाठवण्यात आली असून त्यावरुन क्लेम करता येणार आहे. त्यानंतर इन्शुरन्स कंपनी क्लेमचे पैसे प्रवाशाला देणार आहे. तेजस ही देशातील खासगी मालिकीची ट्रेन असून त्याचे संचालन आयआरसीटीसी करत आहे. या एक्सप्रेसमध्ये प्रवाशाला आरामदायी प्रवास करता येणार आहे. तसेच एका तासापेक्षा तेजस एक्सप्रेस उशिराने आल्यास कंपनीकडून दंडाची रक्कम दिली जाणार आहे.(शताब्दी, तेजस आणि गतिमान एक्सप्रेसच्या तिकीट दरात 25 टक्के कपात होण्याची शक्यता)

खरंतर नवी दिल्लीला जाणारी 82501 तेजस एक्सप्रेस कृषक एक्सप्रेसच्या डिरेलमेंटच्या कारणामुळे पावणे तीन तास उशिराने सोडण्यात आली. तसेच कृषक एक्सप्रेस तर 10 तास उशिराने सोडली गेली. डिरेलमेंटच्या कारणामुळे लखनौ मेल, पुष्पक एक्सप्रेस आणि चंदीगढ एक्सप्रेससह अन्य ट्रेन सुद्धा उशिराने सोडल्या गेल्या.