Sanjay Raut (Photo Credit - Twitter)

राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विशेष म्हणजे हा शपथविधी सोहळा अगदीच साधेपणाने झाला. इतका साधेपणाने की एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांपैकी एकही आमदार या शपथविधी सोहळ्यास हजर नव्हता. या शपथविधी नंतर अनेक नेत्यांनकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शुभेच्छाच वर्षाव होत आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला त्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. शिंदे यांना मी शिवसैनिक मानत नाही, भाजपने शिवसैनिकांना मुख्यमंत्री केले नसल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच शिवसेना फोडण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Tweet

नवीन सरकारने चांगले काम करावे, असे संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषदेत सांगितले. मी या सरकारचे अभिनंदन करतो. मी त्यांचे स्वागत करतो. उद्धव ठाकरेंचे सरकार जेव्हा आले होते तेव्हा ते पहिल्या दिवसापासुन सांगत होते की ते आम्ही सरकार पाडू. पण आम्ही अस काही करणार नाही. आम्ही या सरकारला अडचणीत आणणार नाही, त्यांनी जनतेसाठी काम केले पाहिजे असे संजय राऊत म्हणाले. (हे देखील वाचा: Eknath Shinde At Goa Hotel: शपथ घेतल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोव्याला रवाना, हॉटेलमधील आमदारांकडून जल्लोशात स्वागत)

ईडीच्या समन्सबाबत ते म्हणाले की, हे सर्वस्वी राजकीय आहे हे सर्वांना माहीत आहे. केंद्रीय एजन्सीने मला बोलावले आणि मी एक नागरिक तसेच खासदार आहे. त्यामुळे मी ईडीकडे जाणार. तसेच सवाल उपस्थित करत राऊत म्हणाले की, हे सर्व माझ्यासोबतच का होत आहे? ते कोण करत आहे? हे आपण जाणून आहोत.