इस्त्रो कडून  PSLVC46 द्वारा  RISAT2B उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; सुरक्षा यंत्रणा होणार अधिक मजबूत
Image used for representational purpose | (Photo Credits: Twitter/@ISRO)

श्रीहरीकोटा (Sriharikota) येथील रॉकेट पोर्ट येथून आज (22 मे) इस्त्रो (ISRO)ने 'पीएसएलवी-सी46' चे प्रक्षेपण केले आहे. आज सकाळी 5.30 वाजता हे उड्डाण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 2019 सालमधील इस्त्रोचे हे तिसरे उड्डाण आहे. PSLVC46 हे शेती, वन विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी फायदेशीर ठरणार आहे. Chandrayaan 2 Mission: 13 भारतीय पेलोड आणि 'नासा'च्या एका उपकरणासह चंद्रयान 2 मिशन अवकाशात झेपावणार, ISRO ची माहिती

ANI Tweet

मंगळवार (21 मे) दिवशी पीएसएलवी चे प्रक्षेपण सकाळी 4.30 पासून सुरू करण्यात आले होते. सुमारे 25 तासांच्या तयारीनंतर आज सकाळी हे रॉकेट आकाशात झेपावले आहे. यामुळे आता भारताची सुरक्षा अधिक फायदेशीर होणार आहे. रॉकेट आपल्यासोबत 615 किलोग्राम चे ‘रीसैट (RISAT)घेऊन आकाशात झेपावले आहे.

या सॅटेलाईटच्या मदतीने जमीनीवरून सुमारे 3 फीट उंचीवरील फोटो काढता येऊ शकतात. सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणेला मदत होणार आहे. इस्त्रोने या प्रक्षेपणानंतर आनंद व्यक्त केला आहे. पुढील महिन्यात इस्त्रोकडून बहुप्रतिक्षित चांद्रयान 2 चे प्रक्षेपण केले जाणार आहे.