ISRO chief S Somanath यांना Aditya-L1 च्या लॉन्च दिवशीच कॅन्सरच (Cancer) निदान झाल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रयान 3 च्या लॉन्च नंतर एस सोमनाथ घराघरात पोहचले. मात्र यानंतरच त्यांना काही आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावं लागलं असल्याची बाब त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितली आहे. S Somanath यांच्या पोटामध्ये कॅन्सरच्या गाठीची वाढ होत होती. त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया आणि केमो थेरपी करण्यात आल्याने त्यांनी कॅन्सर वर मात केली आहे.
Tarmak Media House ला नुकत्याच दिलेल्या मुलाखती मध्ये त्यांनी ' आदित्य एल 1 च्या लॉन्च दिवशी सकाळी आपण स्कॅन केल्याचं सांगितलं. त्यामध्ये पोटात कॅन्सर वाढत असल्याचं समजलं. जसे लॉन्च झाले तसे मला आजारपणाचे समजलं. लॉन्च नंतर चैन्नईला जाऊन पुन्हा स्कॅन केले. ज्याद्वारा पुढील चाचण्या करण्यात आल्या आणि कॅन्सरचं निदान झालं.' असे S Somanath म्हणाले. सोमनाथ यांचा आजार अनुवंशिक होता. नंतर यामधून कॅन्सरचं निदान समोर आलं.
Aditya-L1 च्या लॉन्च नंतर डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया आणि केमो थेरपी सुरू केली. कॅन्सरचं निदान हे आपल्यासाठी आणि कुटुंबासाठी देखील धक्का असल्याचं ते सांगतात. सध्या सोमनाथ यांनी कॅन्सर वर मात केली आहे मात्र औषधं सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सोमनाथ यांनी हॉस्पिटल मध्ये 4 दिवस उपचार घेतल्यानंतर पाचव्या दिवसापासून कामाला सुरूवात केली. त्यांना कोणत्याही वेदना होत नसल्याचं ते म्हणाले आहेत. सोमनाथ यांनी आपण कॅन्सर वर मात करून आता इस्त्रो च्या कामावर लक्ष देणार असल्याचं म्हणाले आहेत. Aditya-L1 Mission: पुढील पाच वर्ष 'आदित्य L1' दररोज 1440 फोटो पाठवणार, जाणून घ्या कधी येणार सूर्यावरील पहिला फोटो .
आदित्य एल 1 हा भारताचा पहिला सोलर ऑब्झवेटरी आहे. 2 सप्टेंबरला तो लॉन्च करण्यात आला. स्पेस मध्ये 4 महिन्याच्या प्रवासानंतर 6 जानेवारीला तो L1 point मध्ये स्थिरावला आहे.