S Somanath | Twitter

चंद्रयान 3 च्या ऐतिहासिक कामगिरीनंतर जगभरातून भारताच्या वैज्ञानिकांचं होत आहे. अशामध्ये आज ISRO Chairman S Somanath यांनी केरळ मध्ये तिरुवनंतपुरम च्या पूर्णमिकवु भद्रकाली मंदिर मध्ये दर्शन घेत पूजा अर्चना केली आहे. यावेळी मंदिरात येण्यामागील विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना त्यांनी "मी एक संशोधक आहे. मी चंद्राचा अभ्यास करतोय. मी अंतराळाचा अभ्यास करतो. विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही शोधणे हा माझ्या आयुष्यातील प्रवासाचा एक भाग आहे. त्यामुळे मी अनेक मंदिरांना भेटी देतो आणि अनेक धार्मिक पुस्तकंही वाचतो. त्यामुळे या विश्वात आपल्या अस्तित्वाचा आणि आपल्या प्रवासाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करा. हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. त्यामुळे विज्ञानाची कास धरून बाह्य जगाचा आणि अध्यात्माने आतील जगाचा माझा शोध घेण्याचा प्रयत्न आहे." असं ते म्हणाले.

पहा सोमनाथ यांची प्रतिक्रिया

चंद्रमोहिमेचे अपडेट्स देताना त्यांनी चांद्रयान-३, लँडर, रोव्हर ठीक आहेत. बोर्डवरील पाचही उपकरणे कार्यान्वित झाली आहेत आणि आता डेटा देत आहेत. येत्या काही दिवसांत आम्ही सर्व प्रयोग पूर्ण करू शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. वेगवेगळे टप्पे आहेत, ज्यासाठी त्याची चाचणी घ्यावी लागते. ही कामं सुरळीत सुरू आहे.

चांद्रयान-3 च्या टचडाउन पॉइंटला 'शिवशक्ती' असे संबोधले जात असताना, इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले की, पंतप्रधानांनी त्याचा अर्थ आपल्या सर्वांसाठी योग्य अशा प्रकारे स्पष्ट केला. मला वाटतं त्यात काही गैर नाही. ते म्हणाले की, बघा, आपण जे करत आहोत त्याला महत्त्व असायला हवे आणि देशाचे पंतप्रधान या नात्याने नाव घेणे हा त्यांचा विशेषाधिकार आहे.

इस्त्रो च्या वैज्ञानिकांनी चंद्रयान 3 लॉन्च करण्यापूर्वी देखील त्याची प्रतिकृती घेऊन तिरूपती  बालाजीचं  दर्शन घेतलं होतं.