रेल्वेने प्रवास करण्यासाठी सध्या प्रशासनाकडून ऑनलाईन पद्धतीने तिकिट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे नागरिकांचा रांगेत उभे राहण्यासह डिजिटल पद्धतीला चालना मिळावी म्हणून ही सोय करुन देण्यात आली आहे. मात्र काही वेळेस बुकिंग केलेले तिकिट रद्द करण्याची वेळ आल्यास प्रवाशाला रेल्वेस्थानकातील तिकिट खिडकीवर जाऊन ते कॅन्सल करावे लागते. त्यासाठी पुन्हा वेळ वाया जातो. त्याचसाठी आता रेल्वे प्रशासनाने ऑनलाईन पद्धतीने खरेदी केलेले ई-तिकिट रद्द करण्याठी नवी सुविधा सुरु केली आहे. त्यानुसार प्रवाशाला ई-तिकिटाचे रिफंड मिळण्यासाठी फक्त एका OTP चा वापर करावा लागणार आहे.
आयआरसीटीसीने याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, ही सुविधा फक्त अधिकृत रेल्वे ऐजंटकडून बुक करण्यात आलेल्या ई-तिकिटांसाठीच लागू असणार आहे. त्यामुळे तिकिट बुकिंगच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येणार आहे. मात्र ओटीपीच्या माध्यमातून तिकिटाचे रिफंड मिळण्यासाठी त्याला अधिकृत ऐजंटला त्याबाबत अधिक माहिती द्यावी लागणार आहे.(सणासुदीच्या काळात ख्रिसमसपर्यंत धावणार 200 जादा गाड्या; पहिल्यांदा उपलब्ध होणार 'या' सुविधा- रेल्वेचा निर्णय)
Central Railway Tweet:
Railways has initiated a more transparent refund system for reserved e-tickets which are cancelled or which are fully waitlisted dropped tickets. It is an OTP based system. This system is applicable to those e-tickets which are booked through IRCTC authorised agents only. pic.twitter.com/WaLiWeKgcL
— Central Railway (@Central_Railway) October 29, 2019
तसेच तिकिट बुकिंग करताना प्रवाशाला त्याचा मोबाईल क्रमांक देणे अनिवार्य असणार आहे. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने असे सांगितले की, जवळजवळ 27 टक्के तिकिटांचे विक्री प्रत्येक दिवशी अधिकृत ऐजंटच्या माध्यमातून करण्यात येते. त्यामधील 20 टक्के तिकिटे दररोज रद्द केली जातात. तसेच सणासुदीच्या काळात तिकिटांचा काळाबाजार होत असल्याने विविध ठिकाणी पोलिसांकडून छापेमारी करण्यात आली. त्यामध्ये जवळजवळ 23 तिकिट ऐजंटला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 9 लाखांपेक्षा अधिक तिकिटांची रक्कम जप्त केली आहे. तर मध्य रेल्वेकडून तिकिटाच्या काळाबाजाराला चाप बसण्यासाठी 'ऑपरेशन धनुष ' नावाचे अभियान सुरु करण्यात आले आहे.