IRCTC Updates:ट्रेनमध्ये आता खाण्या-पिण्यावरील सर्व्हिस  टॅक्स बाबत मोठी अपडेट आली समोर; पहा नवे दर
IRCTC | (Photo Credits: Wikipedia)

IRCTC कडून चालवल्या जाणार्‍या शताब्दी, राजधानी, दुरांतो, वंदे भारत सारख्या ट्रेन मध्ये जेवणाच्या ऑर्डरशी निगडीत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. भारतीय रेल्वेने प्रिमियम ट्रेन मध्ये लागणारा सर्विस टॅक्स आता रद्द केला आहे. त्यामुळे जे प्रवासी तिकीटामध्ये खाण्याचा पर्याय स्विकारणार नाहीत त्यांना सर्विस टॅक्स नसेल. यापूर्वी शताब्दी, राजधानी, दुरांतो, वंदे भारत मध्ये तिकीट बुकिंग करताना जेवण घेतले नसले तरीही सर्विस टॅक्स द्यावा लागत होता. नव्या नियमांनुसार, ट्रेन मध्ये मिळणार्‍या चहा, नाश्ता, खाण्याचे पदार्थ यांचे दर बदलले आहेत.

याआधी, रेल्वे प्रवासादरम्यान IRCTC चहा किंवा कॉफी ऑर्डर करण्यासाठी 70 रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारत होती त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी होती. भारतीय रेल्वे 20 रुपयांच्या चहासाठी 50 रुपये सेवा शुल्क आकारत होती. सोशल मीडियावर यावर बरीच चर्चा झाली, त्यामुळे भारतीय रेल्वेवरही टीका होत होती. नक्की वाचा: Indian Railway: भारतीय रेल्वेत 20 रुपयांच्या चहावर 50 रुपयांचा सर्व्हिस टॅक्स; यूजर्स म्हणाले, 'भाऊ रेल्वे काय करत आहे?'

नवे दर

प्रवाशांना आता सामान्य दरात पाणी आणि चहा यांसारख्या सुविधा मिळणार आहेत, मात्र नाश्ता आणि जेवणासाठी प्रवाशांना आता 50 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. IRCTC मधील सुधारित जेवण दरांनुसार, पदार्थ प्रवासादरम्यान ऑर्डर केल्यास नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासाठी 50 रुपये जास्त लागतील आणि तिकिटांसह प्री-बुकिंग केले जाणार नाही, तर सर्व प्रवाशांसाठी सकाळच्या चहाचे शुल्क आकारले जाणार आहे.

परिपत्रकानुसार, राजधानी, शताब्दी आणि दुरांतोमध्ये सेकंड आणि थर्ड एसीमध्ये सकाळच्या चहाचा दर 20 रुपये आहे, तर IA/EC मध्ये 35 रुपये मोजावे लागतील. त्याचबरोबर सेकंड आणि थर्ड एसीमध्ये नाश्त्यासाठी 105 रुपये मोजावे लागणार आहेत. एसी चेअर कारमध्ये नाश्त्यासाठी १५५ रुपये मोजावे लागतील. सेकंड एसी, थर्ड एसीमध्ये 185 रुपयांमध्ये लंच आणि डिनर मिळेल. त्याच वेळी, चेअर कारमध्ये, तुम्हाला 235 रुपये द्यावे लागतील, IA/EC मध्ये, रात्रीचे जेवण आणि दुपारचे जेवण 245 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.