Post Office (PC-Wikimedia Commons)

इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) आपल्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून डिजिटल रुपात बचत खाते सुरु करण्याची सुविधा देत आहे. पोस्ट ऑफिस खातेधारक आयपीपीबी मोबाईल अॅपच्या माध्यमातून अत्यंत सोप्प्या पद्धतीने बेसिक बँकिंगेचे व्यवहार करु शकतात. यापूर्वी ग्राहकांना खात्यात पैसे भरणे किंवा काढणे, खात्यातील रक्कम तपासून पहाणे, पैसे ट्रान्सफर करणे यासारख्या अन्य कामांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागत होते. परंतु आता पोस्ट ऑफिस आरडी, पीपीफ आणि सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गतील खात्यात ही पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत.

जर तुमच्याकडे आयपीपीबी खाते सुरु करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाण्यासाठी वेळ नाहीय. तसेच तेथील लांबलचक रांगेत उभे राहण्यापासून वेळ वाचवायचा असेल तर आयपीपीबी अॅप डाऊनलोड करा. याच्या माध्यमातून डिजिटल बचत खाते सुरु करता येणार आहे. खाते सुरु करण्यासाठी 18 वर्षांहून अधिक वय आणि भारतीय नागरिक असणे अनिवार्य आहे. तर जाणून घ्या त्याच्या प्रक्रियेबद्दल अधिक.(येत्या 1 मार्चपासून 'या' बँकांचे बंद होणार IFSC कोड, ऑनलाईन मनी ट्रान्सफर करताना होणा-या त्रासापासून वाचण्यासाठी करा हे महत्त्वाचे काम)

- प्रथम तुमच्या मोबाईल फोनमध्ये आयपीपीबी बँकिंग अॅप डाऊनलोड करा. आता आयपीपीबी मोबाईल अॅप सुरु करुन Open Account वर क्लिक करा.

-येथे तुम्हाला पॅन कार्ड क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक द्यावा लागणार आहे.

-या दोन्ही गोष्टी दिल्यानंतर तुमच्या लिंक केलेल्या मोबाईलवर एक ओटीपी येणार आहे. तो आता ओटीपी द्यावा लागणार आहे.

-आता तुम्हाला आईचे नाव, शैक्षणिक योग्यता, पत्ता आणि नॉमिनी यांची माहिती द्यावी लागणार आहे.

- ही सर्व माहिती दिल्यानंतर तुमचे खाते सुरु होणार आहे.

-आता तुम्ही हे बचत खाते आयपीपीबी मोबाईल अॅपच्या माध्यमातून वापरु शकणार आहात.

डिजिटल बतच खाते हे फक्त एका वर्षासाठी वैध असते. खाते सुरु केल्यानंतर एका वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला त्याचे बायोमेट्रिक प्रमाणिकरण करणे अत्यावश्यक आहे. त्यानंतर त्याचे नियमित बचत खात्यात रुपतांतरण केले जाणार आहे.