Internet Ban in Haryana: शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे हरियाणातील 7 जिल्ह्यांमध्ये उद्या इंटरनेट सेवा बंद, सरकारने जारी केले आदेश
internet | (Photo credit: archived, edited, representative image)

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने (Haryana Govt) राज्यातील अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिस्सार, फतेहाबाद आणि सिरसा (Ambala, Kurukshetra, Kaithal, Jind, Hisar, Fatehabad and Sirsa) जिल्ह्यांतील मोबाईल इंटरनेट सेवा, (Mobile internet services) बल्क एसएमएस आणि सर्व प्रकारच्या डोंगल सेवा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. हा आदेश 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू होईल आणि 13 फेब्रुवारी रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत लागू राहील. फक्त व्हॉईस कॉल सेवा चालू राहतील.

पाहा पोस्ट -

  • हा आदेश फक्त वर नमूद केलेल्या 7 जिल्ह्यांमध्ये लागू आहे.
  • या आदेशाचा परिणाम फक्त मोबाईल इंटरनेट सेवा, बल्क एसएमएस आणि डोंगल सेवांवर होतो. व्हॉईस कॉल सेवा सुरू राहतील.
  • हा आदेश 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू होईल आणि 13 फेब्रुवारी रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत लागू राहील.
  • या निर्णयाला शेतकरी संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांनी विरोध केला आहे.

अफवा पसरवणे आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आंदोलनादरम्यान अराजकता पसरू शकते आणि सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते, अशी सरकारला भीती वाटत आहे.