International Yoga Day 2020:ITBP ते भारतीय लष्कर दलातील जवानांनी 'असा' साजरा केला यंदाचा जागतिक योग दिवस!
International Yoga Day 2020| Photo Credits ANI

भारतासह जगभरामध्ये आज जागतिक योग दिवस साजरा केला जात आहे. दरम्यान आज (21 जून) पहाटेपासूनच अनेक योगप्रेमींनी एकमेकांना शुभेच्छा देत योगाअभ्यास करत हा दिवस साजरा केला आहे. यामध्ये यंदा भारतीय लष्कर दल आणि ITBP जवानांनी देखील सहभाग घेत योगाभ्यास केला आहे. ITBP म्हणजेच Indo-Tibetan Border Police यांनी कुठे 18,000 फीटवर योग साधना केली तर कुठे घोड्यांच्या पाठीवर आणि त्यांच्या सोबतही योगाभ्यास केल्याची माहिती, फोटो सध्या सोशल मीडियामध्ये शेअर केले जात आहेत. दरम्यान यंदा कोरोनाचं सावट असल्याने योगाभ्यास हा घरच्या घरी करण्याचं आवाहन सरकारकडून आलं होत. आज सकाळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना संबोधित करून या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

ITBP प्राण्यांसोबत

अरूणाचल प्रदेश मध्ये ITBP जवानांनी Animal Training School (ATS)ने घोड्यांसोबतही आजचा योगदिन साजरा केला आहे.

ITBP जवान 18,000 फूटांवर

नॉर्थ सिक्कीममध्ये इंडो तिबेटियन जवानांनी चक्क 18 हजार फुटांवर एकत्र येऊन आजचा योग दिन साजरा केला आहे.

लडाख मधील दृष्य

उत्तराखंड मधील दृष्य 

भारतीय लष्कर दल

सीआरपीएफ जवान 

 

जम्मू कश्मीर मध्ये सीआरपीएफ जवानांनी साजरा केला जागतिक योग दिन.

नरेंद्र मोदी यांनी असे म्हटले आहे की, लहान मुले, तरुण वर्ग, परिवारातील वृद्ध व्यक्ती जेव्हा एकत्रितपणे योगाभ्यास करतात त्यावेळी ते सर्वजण योगाच्या माध्यमातून जोडले जातात. असे केल्याने संपूर्ण घरात उर्जेचे संचार होते. याच कारणास्तव यंदाच्या योग दिवस, भावनात्मक योग दिवस सुद्धा आहे. परिवारातील Bonding वाढण्याचा आजचा हा दिवस आहे. असा संदेश आज नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.