आज संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योगा दिन (International Yoga Day 2020) साजरा केला जात आहे. आज सोशल मिडियावर तुम्ही या खास दिवसाचे अनेक फोटो पहिले असतील मात्र, सध्या योगसाधनेचा एक खास व्हिडिओ, काही फोटोज व्हायरल होत आहेत. हे फोटो आहेत भाजपा खासदार सुखबीरसिंह जौनापुरिया (Sukhbir Singh Jaunapuria). समाजसेवा व फिटनेस मंत्राबद्दल चर्चेत असलेले टोंक सवाई माधोपूरचे भाजपा खासदार (BJP MP) सूखबीर सिंह जौनापुरिया यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, अग्निसाधनासह, मड बाथ, जिममध्ये व्यायाम, शंख नाद अशा अनेक गोष्टींद्वारे जगाला फिटनेसचा संदेश दिला आहे.
पहा फोटो -
सध्याच्या उन्हामध्ये आपल्याभोवती अग्नी जाळणे हे ऋषी-मुनींच्या अध्यात्मिक अभ्यासाचा एक भाग असू शकतो, परंतु टोंक सवाई माधोपूरचे खासदार सुखबीर जौनापुरिया यांनी योग दिनाच्या दिवशी असेच काही केले. आयुष्यात निरोगी राहण्यासाठी तंदुरुस्त राहणे अत्यंत आवश्यक आहे, असा संदेश या खासदारांनी दिला आहे. म्हणूनच ते स्वत: दररोज 3 ते 4 तास योग, व्यायाम आणि ध्यानात व्यतीत करतात. याचा परिणाम म्हणजे गेल्या 4 महिन्यांत त्यांनी 25 किलो वजन कमी केले आहे. शरीरावर चिखल फासणे, आगीच्या रिंगणात योगाभ्यास केल्यास एखाद्या व्यक्तीचा मधुमेह बरा होतो. तसेच या पद्धतीचा वापर केल्यास सर्व आजार बरे होतात असा दावाही जौनापुरिया यांनी केला आहे. (हेही वाचा: जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने रामेश्वरम येथील 'Palk Strait' मध्ये पाण्यावर तरंगत नागरिकांनी केली योगासने (Watch Video))
पहा व्हिडिओ -
दरम्यान, आज सहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस एकात्मताचा दिवस आहे. हा दिवस सार्वभौम बंधुत्वाचा संदेश देणारा आहे. कोरोनाच्या या संकटकाळातही या दिवसाबद्दल लोक उत्साही आहेत.’ 21 जून 2015 रोजी योग दिनास प्रारंभ झाला. यंदाच्या योग दिनाची थीम ‘योगा फॉर हेल्थ, योगा फ्रॉम होम' अशी आहे. या दिवसानिमित्त आयुष मंत्रालयाने लेहमध्ये मोठा कार्यक्रम घेण्याची योजना आखली होती, परंतु कोरोना साथीच्या आजारामुळे तो रद्द करण्यात आला.