International Yoga Day 2020: जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने रामेश्वरम येथील 'Palk Strait' मध्ये पाण्यावर तरंगत नागरिकांनी केली योगासने (Watch Video)
People practising yoga in Palk Strait (Photo Credits: ANI/Screengrab)

International Yoga Day 2020 Celebration: आज देशभरात आंतराराष्ट्रीय योग दिनाचा (International Yoga Day 2020) उत्साह पाहायला मिळत आहे. जनसामन्यांपासून ते सेलिब्रेटीज पर्यंत तर राजकीय नेत्यांपासून सीमेवरील जवानांपर्यंत सर्वांनी योगासने करून आज हा दिवस साजरा केला आहे. एकीकडे लडाख येथे बर्फाच्या मध्ये योगासने करणाऱ्या जवानांचे फोटोस व्हिडीओज सोशल मीडियावर चर्चेत असताना आता थेट रामेश्वरम मधून एक हटके व्हिडीओ समोर येत आहे. तामिळनाडू (Tamilnadu) येथील रामेश्वर (Rameshwaram)  Palk Strait मधील समुद्राच्या पाण्यात तरंगून काही नागरिकांनी योगासने करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. चक्क पाण्यावर टांगत असताना ही मंडळी ओम चा जप करत आहेत. एक मिनिट 40 सेकेंदाची ही थक्क करणारी व्हिडीओ क्लिप सध्या तुफान व्हायरल होत आहे. International Yoga Day 2020:ITBP ते भारतीय लष्कर दलातील जवानांनी 'असा' साजरा केला यंदाचा जागतिक योग दिवस!

आज योग दिनाच्या निमित्ताने असे अन्यही अनेक हटके व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास, भाजपचे खासदार सुखबिर सिंह जनपुरीया यांनी अंगावर चिखल लावून आगीच्या रिंगणात उभे राहून योगासने केली होती हा व्हिडीओ सुद्धा बराच चर्चेत आहे.

ANI ट्विट

दरम्यान, आजच्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांची संवाद साधला होता. COVID19 व्हायरस खासकरुन आपल्या श्वासाच्या वाटे आपल्या शरीरात पोहचतो अशा वेळी आपली Respiratory system अधिक बळकट करण्यासाठी प्राणायम, अनुलोम- विलोम नक्की करायला हवे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा योग साधण्यासाठी योगाभ्यास महत्वाचा आहे यावरही मोदींनी भर दिला आहे.