ऑनलाईन योगा सिरीजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज भद्रासन (Bhadrasana) कसे करायचे आणि त्यातून मिळणारे फायदे सांगणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. योगा सिरीजमधील आजचे हे सातवे आसन आहे. 21 जून रोजी जगभरात साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोदी यांनी योगा सिरीजची सुरुवात केली आहे. (International Yoga Day 2019 निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली उष्ट्रासनाची माहिती)
नरेंद्र मोदी यांचे ट्विट:
भद्रासन शरीर को दृढ़ रखता है और मस्तिष्क को स्थिर करता है। आइए जानते हैं इस आसन के और कितने सारे फायदे हैं। #YogaDay2019 pic.twitter.com/I9vjtQcgqu
— Narendra Modi (@narendramodi) June 11, 2019
योगा सिरीज अंतर्गत दररोज नरेंद्र मोदी नवनवीन आसने सादर करुन दाखवत आहेत. त्याचबरोबर त्यातून मिळणारे फायदे आणि महत्त्व देखील समजावून सांगितले जात आहे.