भारतात पुन्हा एकदा कोरोना व्हायरस (Coronavirus) प्रकरणांची संख्या वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील लागू असलेल्या निलंबनाची मुदत 30 एप्रिल 2021 पर्यंत वाढविली आहे. सोप्या शब्दात, पुढील महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व मंजूर मार्गांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद असणार आहेत. तसेच डीसीसीए कार्यालयाने म्हटले आहे की, गरज भासल्यास संबंधित प्राधिकरणाच्या मान्यतेने काही आंतरराष्ट्रीय मार्गांवर उड्डाणे चालविली जाऊ शकतात. फेब्रुवारीच्या शेवटी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अनेक देशांमधून येणारी उड्डाणे आणि प्रवाश्यांसाठी सुधारित मार्गदर्शक सूचनांचा एक संच जारी केला. ही मार्गदर्शक तत्वे ब्रिटन, युरोप आणि मिडल इस्टवरून येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना लागू करण्यात आले.
नवीन मानक ऑपरेटिंग प्रक्रिया 22 फेब्रुवारी 2021 पासून लागू केली गेली. परदेशात कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन वाढल्यामुळे आता भारतातही सकारात्मक घटनांच्या वाढत्या प्रमाणानंतर, आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय विमानावरील बंदीचा कालावधी 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आला होता. कोरोना साथीच्या आजारामुळे गेल्या वर्षी 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. (हेही वाचा: COVID-19 Vaccine: मोठा निर्णय, 45 वर्षांवरील सर्व नागरिकांचे होणार कोरोना लसीकरण; केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती)
Suspension of international flights further extended till 30th April 2021. However, international scheduled flights may be allowed on selected routes by the competent authority on case to case basis: Office of Director General of Civil Aviation
— ANI (@ANI) March 23, 2021
22 फेब्रुवारीपासून आरोग्य मंत्रालयाने लागू केलेल्या नियमांनुसार, सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना नियोजित भेटीपूर्वी ऑनलाईन एअर सुविधा पोर्टलवर, कोविडसाठी स्वयंघोषणाचा फॉर्म सादर करावा लागेल. Www.newdelhiairport.in या ऑनलाइन पोर्टलवर प्रवाशांना नकारात्मक COVID-19 RT-PCR अहवालदेखील अपलोड करावा लागेल. तसेच थर्मल स्क्रीनिंगनंतरच प्रवाशांना विमानात चढण्याची परवानगी देण्यात येत होती. सर्व प्रवाशांना मास्क घालणे, सामाजिक अंतराच्या मानकांचे पालन करणे आवश्यक होते. तसेच आरोग्य सेतु अॅप डाउनलोड करणे अनिवार्य होते.