कोरोनामुळे मागील सहा महिन्यात सामाजिक, सांंस्कृतिक, धार्मिक असे सर्व कार्यक्रम रद्द ठेवण्यात आले आहेत. याच पार्श्वभुमीवर यंंदा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हल (International Film Festival) च्या तारखेत बदल करण्यात आले आहेत. केंद्रीय मंंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांंच्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हल हा गोव्यामध्ये 16 ते 24 जानेवारी 2021 दरम्यान आयोजित केला जाणार आहे. यंंदाचे या फेस्टिव्हलचे 51 वे वर्ष आहे. हा कार्यक्रम 20 ते 28 नोव्हेंबर 2020 दरम्यान आयोजित केला जाणर होता मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. PIB च्या ऑफिशियल अकाउंट वरुन याबाबत ट्विट करुन माहिती देण्यात आली आहे. याबाबत गोव्याचे मुख्यमंंत्री प्रमोद सावंंत (Goa CM Pramod Sawant) यांंच्याशी सुद्धा जावडेकर यांंनी चर्चा करुन मग यासंदर्भात घोषणा केली.
पीआयबी च्या माहिती नुसार, हा कार्यक्रम व्हर्चुअल आणि प्रत्यक्ष दोन्ही पद्धतीने पार पडणार आहे.प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी कोरोना संबंंधित सर्व नियमांंचे काटेकोरपणे पालन केले जाईल असे सांंगण्यात आले आहे. यासंदर्भात अलिकडेच आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलची बैठक पार पडली होती.
PIB ट्विट
51st Edition of the #InternationalFilmFestival of India, #Goa postponed to 16th to 24th January, 2021. Earlier it was scheduled to be held from 20th November to 28th November, 2020 1/2#IFFI #IFFIGoa pic.twitter.com/TrUq5NaEHb
— PIB India (@PIB_India) September 24, 2020
दरम्यान, 1975 पासून हा उत्सव आयोजित केला जातो. यंदाच्या 51 व्या आवृत्ती निमित्त जगभरातील विविध देशांंच्या बेस्ट फीचर फिल्मची स्पर्धा घेतली जाणार आहे.