भारतात दहशतवादी हल्ल्यासंदर्भात अलर्ट जाहीर, निशाण्यावर यहुदी नागरिक असल्याने इज्राइल दूतवासाजवळ सुरक्षा वाढवली
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

सप्टेंबर मध्ये होणाऱ्या ज्युइश हॉलिडेच्या आधीच भारतीय गुप्तचर एजंसीने देशभरात दहशतवादी हल्ला होणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. याच कारणास्तव देशभरात हायअलर्ट जाहीर केला आहे. यहूदी नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता सर्व राज्यातील पोलीस प्रमुखांना अलर्ट राहण्याची चेतावणी दिली आहे. ANI यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, दहशतवादी संघटनेकडून इज्राइली नागरिकांना निशाणा बनवले जाऊ शकते. खासियत अशी की, अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता ताब्यात घेण्याच्या आधीच भारतात ही चेतावणी जाहीर केली आहे.(Lucknow ITBP Soldier Dead: लखनौच्या मोहनलालगंज परिसरात ITBP जवानाचा संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह, पोलिसांकडून पुढील तपास सुरू)

देशभरात 6 सप्टेंबर पासून ज्युइश हॉलिडेच्या सुट्ट्या सुरु होणार आहेत. त्यानुसार, दहशतवादी संघटना इज्राइल नागरिक किंवा यहूदी नागरिकांना निशाणा तयार करु शकते. या चेतावणीत पुढे असे म्हटले की, दहशतवादी संघटना यहूदींच्या धार्मिक स्थळांना सुद्धा निशाणा बनवू शकतात. खबरदारी म्हणून इज्राइली दूतवास, वाणिज्य दूतवास आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या आवासासह यहूदी सामुदायिक केंद्रावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.(Tunnel Discovered At Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत सापडला रहस्यमयी ब्रिटीशकालीन बोगदा; लाल किल्ल्यापर्यंत जातो गुप्त रस्ता, जाणून घ्या सविस्तर)

दरम्यान, अधिकाऱ्यांनी असे म्हटले की देशातील विविध सुरक्षा दलांना सुद्धा याबद्दल चेतावणी दिली आहे. त्यांनी पुढे असे म्हटले की, जर आवश्यकता असेल तर देशातील महत्वपूर्ण ठिकाणांवरील सुरक्षा सुद्धा वाढवली जाईल. अधिकाऱ्यांनी पुढे असे म्हटले की, 29 जानेवारी रोजी नवी दिल्लीतील इज्राइली दूतवासाजवळ एक कमी तीव्रतेचा स्फोट झाला होता.