Sheena Bora Murder Case: 'शीना बोरा जीवंत, कश्मीर मध्ये तपास करा' CBI ला Indrani Mukerjea चं पत्र - रिपोर्ट्स
Indrani Mukerjea (Photo Credit: PTI/File)

2012 साली Sheena Bora हत्याकांडाने  देश हादरला होता. मीडीया एक्झिक्युटीव्ह म्हणून काम करणारी इंद्राणी मुखर्जीने (Indrani Mukerjea) तिची लेक शीनाचा खून केल्याच्या आरोप आहे. पण आता या हत्याकांडामध्ये मोठा ट्वीस्ट आला आहे. India Today च्या रिपोर्ट्सनुसार, इंद्राणीने सीबीआय (CBI) ला लिहलेल्या पत्रात शीना जीवंत असून सध्या कश्मीर मध्ये असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

इंद्राणी मुखर्जीने पत्रात लिहलेल्या माहितीमध्ये तिने सध्या कारागृहामध्ये एका महिलेशी बोलताना आपण शीना बोरा ला कश्मीर मध्ये भेटल्याचं म्हटलं आहे. सीबीआय ने कश्मीर मध्ये तपास करण्याचं तिने सूचवलं आहे. सीबीआय कोर्टामध्ये ही इंद्राणी मुखर्जीने अर्ज केला असून त्यावर लवकरच सुनावणीची शक्यता आहे.

काय आहे शीना बोरा मृत्यू प्रकरण ?

मुंबई पोलिसांकडे रजिस्टर केस नुसार, शीना बोरा चा एप्रिल 2012 मध्ये किडनॅपिंग करून खून करण्यात आला. इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी सह 4 जणांना यामध्ये अटक झाली आहे. नंतर ही केस सीबीआय कडे वर्ग करण्यात आली आहे. चार जणांविरुद्ध अनेक चार्ज शीट दाखल आहेत. 6 वर्षांनंतर आता 5 चार्जशीट आणि सप्लिमेंटरी चार्ज शीट दाखल असून सीबीआयने स्पेशल कोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार आता यामध्ये तपास सुरू नाही.

केसची ट्रायल्स 2017 मध्ये सुरू झाली नंतर 60 प्रत्यक्षदर्शींनी स्टेटमेंट रेकॉर्ड केली आहेत. इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी, इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि दुसरा पती संजीव खन्ना यांच्या व्यतिरिक्त देखील अन्य आरोपी या प्रकरणामध्ये आहेत. हे देखिल वाचा:  माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी Let Me Say It Now पुस्तकातून शीना बोरा हत्याकांड आणि दहशतवादी कसाब बाबत केला मोठा खुलासा .

श्यामवर याला दुसर्‍या एक प्रकरणामध्ये ऑगस्ट 2015 मध्ये अटक झाल्यानंतर पहिल्यांदा ही घटना समोर आली होती. तपासामध्ये त्याने शीनाचा खून करून मृतदेह रायगडला पुरल्याची कबुली दिली होती. शीना च्या हत्येमध्ये इंद्राणी आणि संजीव खन्ना यांचा देखील समावेश असल्याचं त्याने म्हटलं होतं.

मुंबई पोलिसांकडून नंतर हा तपास सीबीआय ने घेतला. केस रजिस्टर झाल्यानंतर तीन महिन्यांनी सीबीआयने पीटर मुखर्जी या इंद्राणीच्या पहिल्या पतीला अटक केली. त्याच्यावर शीना बोरा मर्डर केस मध्ये इंद्राणीला मदत करण्याचा आरोप आहे.

कोर्टात मांडलेल्या सीबीआयच्या केसनुसार, इंद्राणीने शीनाचा खून केला कारण पीटर चा लेक राहूल मुखर्जी आणी शीना यांच्यामधील रिलेशनशीप वरून ती संतापलेली होती. त्यावेळी शीनाला ती आपली बहिण म्हणून मिरवत होती. पण शीना इंद्राणीला आपण तिची लेक असून बहिण नाही हे सत्य सार्‍यांसमोर आणू याबाबत धमक्या देत असल्याचं सीबीआयचं म्हणणं होतं.

ड्रायव्हर श्यामवर राय आता केस मध्ये अप्रुव्हर झाला आहे. मार्च 2020 मध्ये पीटर मुखर्जीला जामीन देण्यात आला आहे. ट्रायल दरम्यान इंद्राणी आणि पीटर यांनी त्यांच्यामधील नातं देखील संपवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर 2019मध्ये त्यांच्याही घटस्फोट झाला आहे.