Indore Woman Beggar: दिड महिन्यात भिक मागून अडीच लाख रुपयांची कमाई, इंदौर पोलिसांकडून अटक
Beggar | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

इंदौरमध्ये एक अजबगजब घटना घडली आहे. एका भीक मागणाऱ्या कुटुंबाने दिड महिन्यात तब्बल अडीच लाख रुपये कमावल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. इंद्राबाई या महिलेने आपल्या मुलांना जबरदस्तीनं भीक मागायला लावले होते, अशी माहिती तिला ताब्यात घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले. इंद्राबाई या महिलेने तिच्या मुलांना जबरदस्तीने गुन्ह्यात आणल्या विरोधात तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या महिलेची रवानगी कारागृहात झाली असून मुलीला एनजीओमध्ये पाठवण्यात आले आहे. (हेही वाचा - Beggars Free India: आता 2026 पर्यंत अयोध्येसह देशातील 30 शहरे होणार 'भिकारी मुक्त'; सरकार राबवणार पुनर्वसन उपक्रम, जाणून घ्या सविस्तर)

9 फेब्रुवारी रोजी इंद्राबाई तिच्या मुलीसोबत भीक मागताना पकडण्यात आले. अधिकाऱ्यांना तिच्याकडे 19,600 रुपये आणि मुलीकडे 600 रुपये सापडले. इंद्राने अटकेच्या 45 दिवसांत अडीच लाख रुपये कमावल्याचे उघड झाले. “उपाशी राहण्यापेक्षा आम्ही भीक मागणे पसंत केले. चोरी करण्यापेक्षा हे चांगले आहे, असं तिने यावेळी म्हटलं आहे. तसेच राजस्थानमधील कोटाजवळ एक दोन मजली घर आणि शेतजमीन आहे, ते चांगला स्मार्टफोन वापरतात. तर, तिचा नवरा मोटारसायकलवरून फिरतो. सर्व काही भीक मागून कमावल्याचे तिने सांगितले आहे.

इंद्राला एकून चार मुले असून तीने आपल्या मुलांना जबरदस्तीने भीक मागायला लावले. इंदूरच्या रहदारी असणाऱ्या भागात तसेच उज्जैन महाकालला जाणाऱ्या मार्गावर ती आपल्या मुलांना भीक मागायला लावत असे. मुलांना जबरदस्तीने भीक मागण्यास प्रवृत्त केल्याने पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे.