Indira Gandhi 102 Birth Anniversary: भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या आज (19 नोव्हेंबर) 102 व्या जयंती निमित्त गांधी परिवार आणि कॉंग्रेस नेत्यांनी त्यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळेस कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) , माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह (Manmohan Singh), माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ( Pranab Mukherjee) यांनी उपस्थिती लावली होती. दिल्ली येथे 'शक्ती स्थळ' हे इंदिरा गांधी यांचे स्मृतिस्थळ आहे.
कॉंग्रेस नेत्यांसोबतच अनेक मान्यवरांनी देखील सोशल मीडीयामध्ये आपल्या ट्वीटर अकाऊंटच्या माध्यामातून इंदिरा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधत त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1971 मध्ये उत्तर प्रदेशातील इलाहाबाद येथे झाला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या त्या एकुलते एक अपत्य होत्या. Indira Gandhi Birth Anniversary: भारताच्या Iron Lady इंदिरा गांधींबद्दल काही खास गोष्टी!
कॉंग्रेस नेत्यांनी इंदिरा गांधी यांना वाहिली श्रद्धांजली
Delhi: Congress Interim President Sonia Gandhi, Former Prime Minister Manmohan Singh and Former President Pranab Mukherjee pay floral tribute to Former Prime Minister Indira Gandhi on her birth anniversary. pic.twitter.com/AUuiYH12Dj
— ANI (@ANI) November 19, 2019
भारताच्या राजकीय इतिहासात इंदिरा गांधींकडे अत्यंत खंबीरपणे नेतृत्व करणाऱ्या राजकर्त्या म्हणून पाहिले जाते. पाकिस्तानला युद्धात पराभूत करण्यात आणि बांग्लादेशची निर्मिती करण्यात त्यांचे असलेले महत्त्वाचे योगदान संपूर्ण जगाला परिचित आहे.