कोरोना व्हायरस (Coronavirus) हा विषाणू हा हळूहळू भारताला गिळंकृत करत असल्याचे चित्र दिसत आहे. याचा अंदाज सध्याची कोरोना बाधितांची संख्या पाहिल्यावर येईल. भारतात आज कोरोना बाधितांची एकूण संख्या ही 10,363 वर जाऊन पोहोचली आहे. यात 8988 सक्रिय केसेस, 1035 डिस्चार्ज मिळालेले रुग्ण तसेच 339 मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ही संख्या खूपच धक्कादायक आहे. कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी भारत सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असून डॉक्टर्स, नर्स देखील पूर्ण प्रयत्न करत आहे. मात्र ही संख्या अशीच वाढत राहिली तर येणारा काळ भारतवासियांसाठी खूपच कठीण असेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्रात 352 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्ण आणि 11 मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात एकूण सकारात्मक घटनांची संख्या 2334 वर पोहचली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली. महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे 352 नवीन रुग्ण, 11 जणांचा मृत्यू; राज्यातील संक्रमितांची एकूण संख्या 2334 वर
पाहा ट्विट:
India's total number of #Coronavirus positive cases rises to 10,363 (including 8988 active cases, 1035 cured/discharged/migrated and 339 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/Ie7tMvDstv
— ANI (@ANI) April 14, 2020
काल महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी सर्वात जास्त कोरोना बाधित आढळून आहे त्यामध्ये, मुंबई– 242, मालेगाव- 14, औरंगाबाद- 4, बुलढाणा-4, पुणे- 39, पिपंरी चिंचवड- 6, नागपूर- 11, ठाणे- 9, वसई विरार- 5, ठाणे-9 यांचा समावेश आहे. सर्वात जास्त संख्या असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्रनंतर दिल्ली, तामिळनाडू, राजस्थान व मध्य प्रदेश यांचा नंबर लागतो. कोरोना व्हायरसमुळे देशात 21 दिवस लॉकडाउन आहे. मात्र उद्या ते वाढण्याचीही शक्यता आहे. अनेक राज्यांनी कोरोनाच्या वाढत्या घटना लक्षात घेता 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे.