Coronavirus in India (Photo Credits: PTI)

भारतामध्ये कोरोना व्हायरस बाधितांचा आकडा 3.7 लाखांच्या पार गेला आहे. तर देशात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या 12,237 पर्यंत पोहचली आहे. भारतामध्ये आज आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, 24 तासांत सर्वाधिक कोरोनाबधित रूग्ण आढळले आहे. एका दिवसात 12881 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर 334 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतामध्ये आता कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांचा आकडा 3 लाख 66 हजार 946 पर्यंत पोहचला आहे. ICMR ने दिलेल्या माहितीनुसार, देशात 17 जून पर्यंत 62,49,668 सॅम्पल्स तपासले आहेत. मागील 24 तासामध्ये 1,65,412 सॅम्पल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

भारतामध्ये एकीकडे रूग्ण संख्या वाढत असली तरीही कोव्हिड 19 चा रिकव्हरी रेट देखील सुधारत आहे. आज हा दर 52.95% इतका आहे. तर रूग्ण बरे होण्याचे आणि मृत्यूचे गुणोत्तर 94.07% : 5.93% इतके आहे.

ANI Tweet

भारतामध्ये सध्या 1,60,384 रूग्णांवर कोव्हिड 19 चे उपचार सुरू असून 1,94,325 जणांनी आत्तापर्यंत कोरोनाशी सामना करून या आजारावर विजय मिळवला आहे. दरम्यान आत्तापर्यंत 12,237 जणांची कोरोना विरूद्धची लढाई अयशस्वी ठरली आहे.

देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्रात 1,16,752 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर 5,651 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई, ठाणे, पुणे ही महाराष्ट्रातील कोरोनाची प्रमुख हॉट्सस्पॉट आहेत.

जगातही कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. www.worldometers.info च्या माहितीनुसार, 8,406,068जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर 451,387 जणांनी जीव गमावला आहे. सर्वाधिक रूग्णसंख्या असलेल्या देशांच्या क्रमवारी अमेरिका अग्रस्थानी आहे. त्यानंतर ब्राझील, रशिया आणि भारताचा नंबर लागतो.