DHL Express (संग्रहित संपादित प्रतिमा)

देशातील सर्वात मोठ्या कंपनीचा दर्जा रिलायन्स इंडस्ट्रीजला (Reliance) जातो, तर टाटा ग्रुप ही देशातील सर्वात जुनी कंपनी म्हणून ओळखली जाते. परंतु तुम्हाला माहित आहे, काम करण्याच्या दृष्टीने सर्वात चांगल्या कंपन्यांचा मान टाटा किंवा रिलायन्स ग्रुपला नाही, तर डीएचएल एक्स्प्रेस (DHL Express) आणि महिंद्रा यांसारख्या कंपन्याना मिळाला आहे. मुंबईस्थित संशोधन संस्थेच्या 'ग्रेट प्लेसेस टू वर्क' ने देशातील 2021 मधील अशा कंपन्यांची यादी जाहीर केली आहे ज्या काम करण्यासाठी उत्तम आहेत. या यादीमध्ये लॉजिस्टिक कंपनी डीएचएल एक्सप्रेस इंडियाचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.

डीएचएलनंतर महिंद्र ग्रुपचे नाव या यादीमध्ये येते. महिंद्रा ग्रुपची कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा ऑटोमोटिव्ह अँड फार्म इक्विपमेंट सेक्टर यांना या यादीत दुसरे स्थान मिळाले आहे. काम करण्यासाठी सर्वोत्कृष्ट अशा पहिल्या पाच कंपन्यांमध्ये Intuit India, Aye Finance P Limited आणि Synchrony International Services यांचा समावेश आहे. खास गोष्ट म्हणजे बर्‍याच टेक कंपन्यांचा पहिल्या दहामध्ये समावेश झाला आहे.

काम करण्यास उत्तम अशा Top -10 कंपन्या

  • DHL Express
  • Mahindra & Mahindra Automotive & Farm Equipment Sectors
  • Intuit India
  • Aye Finance P Limited
  • Synchrony International Services
  • Harrisons Malayalam Ltd
  • Salesforce
  • Adobe Inc
  • Cisco Systems India Pvt Ltd
  • Babreque-Nation Hospitality

ग्रेट प्लेस टू वर्कच्या मते, वर्कप्लेस कल्चर सुधारण्याच्या मोहिमेमध्ये 60 हून अधिक देशांतील सुमारे 10,000 संस्था त्यांच्याशी जोडल्या गेल्या आहेत. 'इंडियाज बेस्ट कंपनीज टू वर्क फॉर- 2021' साठी नामांकित झालेल्या देशातील सर्व कंपन्यांचे मूल्यांकन करण्यात आले. त्याअंतर्गत या कंपन्यांची दोन पॅरामीटर्सवर चाचणी घेण्यात आली. (हेही वाचा: महाराष्ट्रासह 'या' 3 राज्यांना कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरीएंटचा धोका, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सावध राहण्याचा इशारा)

यामध्ये प्रथम कर्मचार्‍यांच्या अनुभवांची क्वालिटी आहे आणि दुसरे म्हणजे कंपनीच्या लोकांना हाताळण्याची पद्धत्ती. संस्थेने असा दावा केला आहे की मूल्यांकन प्रक्रियेत समोर आलेल्या डेटाची पडताळणी केली गेली व त्यानंतर त्या आधारे क्रमवारी जाहीर केली.